Ticker

6/recent/ticker-posts

माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन; जनमाहिती अधिकारी व प्रथम अपील अधिकाऱ्यांवर ₹25 हजार दंडाची मागणी


जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती चिमूर यांना चौकशी करून नियमानुसार कारवाईचे निर्देश दिले.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 चंद्रपूर :-माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत जनमाहिती अधिकारी व प्रथम अपील अधिकारी यांनी माहिती न दिल्याप्रकरणी त्यांच्यावर ₹25,000 दंड व शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील अर्जाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती चिमूर यांना आवश्यक ती नियमानुसार कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, अर्जदार पंचशिल  वाळके यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणाची चौकशी करून तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

या पत्रामुळे संबंधित प्रकरणाची अधिकृत स्तरावर दखल घेण्यात आल्याचे स्पष्ट होत नसून, आता गटविकास अधिकारी कोणते अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले ते सत्य पाहण्यासाठी याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या