Ticker

6/recent/ticker-posts

वीर कोतवाल शिक्षण संस्था, सोलापूरचा पारितोषिक वितरण समारंभ 8 ऑगस्टला


 नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थी, उल्लेखनीय व्यक्तींचा होणार गौरव



  राजेश येसेकर चित्रा न्युज 

सोलापूर : वीर कोतवाल शिक्षण संस्था, सोलापूर यांच्यावतीने पारितोषिक वितरण समारंभ - 2026 ला  आयोजित करण्यात आला आहे. नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, उल्लेखनीय विद्यार्थी/व्यक्तींचा सत्कार, जीवन गौरव पुरस्कार वितरण आणि दत्तक पालक योजना अर्थसहाय्य वितरण हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

हा कार्यक्रम शनिवार दि. 08 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 वा.शिवशंकर मंगल कार्यालय, 115 ब, बॉम्बे पार्क रोड, अक्षय सोसायटी, नविन आय.एम.एस. शाळेजवळ, जुले सोलापूर-4 येथे आयोजित करण्यात आला आहे. 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.सोमनाथ विष्णू यादव - लेखक नखाली कादंबरी, श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी हे उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ.अनिल हुलसुरकर - पचिनी नर्सिंग होम, सोलापूर, डॉ.सुहास राऊत - राऊत होमिओपॅथी हॉस्पिटल, बार्शी, डॉ.सुहास जगदाळे - वैद्यकीय अधिकारी, बार्शी,अविनाश जाधव - दुय्यम निबंधक, पुणे, नागेश चौधरी - अध्यक्ष, कै. श्रीमती इंदुमती महारुद्र चौधरी बहु.उदे.संस्था, मोहोळ, सचिन यादव - पोलीस निरीक्षक, धाराशिव आणि शहाजी दुधाळ - पोलीस उपनिरीक्षक, सोलापूर यांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कार पांडुरंग वि.चौधरी, भगवानराव शि.काशिद, भिमराव ना.गंगधरे,मधुकर ना.श्रीवास्तव यांना प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच सन्मानार्थी म्हणून राकेश खडंगळे - सहा.कृ.अधिकारी, विश्वंभर काळे - निवृत्त प्राचार्य, विभिषण माने - निवृत्त प्राचार्य, सुरेश गवळी - निवृत्त मुख्याध्यापक, प्रशांत वाघमारे - आदर्श शिक्षक, लेखक आणि राहुल इंगळे - समाजसेवक अधिकारी, सोलापूर शहर यांचा सन्मान होणार आहे.

वीर कोतवाल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग वि.चौधरी आणि अध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर रा.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
__________________________________

सोलापूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा

वीर कोतवाल शिक्षण संस्थेचा पारितोषिक वितरण समारंभ 8 ऑगस्टला शिवशंकर मंगल कार्यालयात. गुणवंत विद्यार्थी, उल्लेखनीय व्यक्तींचा सत्कार व जीवन गौरव पुरस्कार वितरण. प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.सोमनाथ यादव. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग चौधरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या