स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, ₹9,300 रोख जप्त
प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : भद्रावती शहरातील गवराळा येथील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे ₹10 हजारांची रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या रकमेपैकी ₹9,300 रोख जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे मंदिरातील चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला आहे.
ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. गवराळा परिसरातील हनुमान मंदिरातील दानपेटी अज्ञात व्यक्तीने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी मंदिर ट्रस्टच्या वतीने भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर शहर उपविभाग वरोरा पथक भद्रावती हद्दीत पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील आरोपी शुभम विठ्ठल झाडे वय 31, रा. झाडे प्लॉट, भद्रावती याच्यावर संशय आला. त्याला सुमठाणा परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मंदिरातील दानपेटी फोडल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून ₹9,300 रोख रक्कम जप्त केली.
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अप. क्र. 714/2026, कलम 331(4), 305 बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, भद्रावती पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेश्वर पारधी, API बलराम झाडोकर, PSI सर्वेश बेलसरे, यांच्यासह पोलीस हवालदार सुभाष गोहकार, सचिन गुरनुले, पोलीस शिपाई विठ्ठल काकडे, प्रफुल्ल पुप्पलवार, प्रतीक हेमके आणि चालक दिनेश अराडे यांच्या पथकाने केली.
मंदिरातील चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणून आरोपीला बेड्या ठोकल्याने भद्रावती परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
______________________________
गवराळा हनुमान मंदिर चोरीचा गुन्हा उघड
दानपेटी फोडून ₹10 हजार लंपास करणारा शुभम झाडे अटकेत. एलसीबीच्या पथकाने सुमठाण्यातून पकडले. आरोपीकडून ₹9,300 जप्त. भद्रावती पोलिसात गुन्हा दाखल.


0 टिप्पण्या