Ticker

6/recent/ticker-posts

सुसंस्कृतपणा व संयम यातून यश प्राप्त होते- आ. अविनाश ब्राम्हणकर


रवि भोंगाने चित्रा न्युज 
साकोली :  नवयुवक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जासवंत कापगते ८१ वर्षांचे असूनही ते नवयुवक वाटतात ही सर्वांसाठी प्रेरणादायक बाब आहे. प्रीतीचा आयुष्यातील खूप मोठा संघर्ष आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतून तिने खूप मोठी यशाची उंची गाठली आहे. राजकारणात अनेकदा कटुता निर्माण होते पण ती कटुता तिथेच विसरून पुढे जाणे गरजेचे असते. कितीही मोठ्या पदावर पाहोचले तरी वैचारिक दर्जा, सुसंस्कृतपणा व संयम कायम ठेवून वागणे गरजेचे असते तरच यशाचे पुढचे टप्पे गाठता येतात. असे प्रतिपादन आ. अविनाश ब्राम्हणकर यांनी जांभळी ( सडक ) येथे आयोजित करण्यात आलेल्या सहस्त्रचंद्रदर्शन सत्कार सोहळा व गौरव सोहळा कार्यक्रमात केले. नवयुवक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जासवंत पाटील कापगते यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा व  गोंडवाना विद्यापिठाच्या वतीने आचार्य पदवीने सन्मानित संस्थेच्या संचालिका प्रीती कापगते ( हातझाडे ) तसेच नवनियुक्त आ. अविनाश ब्राम्हणकर यांचा गौरव सोहळा जांभळी ( सडक )  मार्तंडराव पाटील कापगते विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्कार कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सत्कारमूर्ती जासवंत कापगते, डॉ. प्रीती कापगते ( हातझाडे ), आ. अविनाश ब्राम्हणकर तसेच अध्यक्षस्थानी  माजी आ. डॉ. हेमकृष्ण कापगते, अतिथी म्हणून मातोश्री यशोदा कापगते, जि. प. सदस्य वनिता डोये, जि. प. सदस्य जयश्री देशमुख, माजी जि.प. सदस्य डॉ. विनोद नाकाडे, माहेश्वरी नेवारे,  डॉ. प्रभाकरराव गहाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रेम गहाणे, सभापती डॉ. उमाकांत काशिवार, जीवन शिक्षण संस्था लाखनीचे अध्यक्ष धनंजय तिरपुडे, श्याम शिक्षण संस्था खोडशिवनीचे अध्यक्ष शामराव मस्के, नवयुवक शिक्षण संस्थेचे सचिव तथा आयोजक होमराज कापगते आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषण करतांना माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी सत्कार मूर्तीना शुभेच्छा देत उपस्थित सर्वाना कुटुंबातील कोणाचाही मृत्यू झाल्यास मरणोतर नेत्रदानासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक प्राचार्य होमराज कापगते यांनी तर सूत्रसंचालन एल. बी. पारधीकर व शारदा कोलटेके यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक सुशील कापगते यांनी केले. यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य अर्चना सार्वे, प्राचार्य रामकृष्ण लंजे तसेच मार्तंडराव कापगते विद्यालय जांभळी  व रामाजी कापगते विद्यालय बोदरा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या