चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-वृक्ष लागवड चळवळीचे महत्त्व लक्षात घेऊन धम्मकुटी आलेबेदर येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. सम्राट अशोक बहुउद्देशीय बचत गटाच्या वतीने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या निमित्ताने जैवविविधता अभ्यास दौराही आयोजित करण्यात आलेला होता. संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद भोवते यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. याप्रसंगी जमनापूर गट ग्रामपंचायत सरपंच पूजा देशमुख यांच्यासह राजेश भालेराव गडपायले, प्रदीप रंगारी, अशोक रंगारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने सदर परिसरामध्ये विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
-----------------------------------------------
सेंदूरवाफा येथे ५०० वृक्षांचे वृक्षारोपण
सेंदूरवाफा येथील पटाच्या दाणीवर लीलाधर मुंगुलमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात विशेष कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला नगरसेवक तथा गटनेते संदीप बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी पट समितीचे अध्यक्ष विलास कापगते, उपाध्यक्ष नरेंद्र वडिभस्मे, सचिव महेश वाघदेवे, नगरसेविका त्रिवेणी चौधरी, राजुभाऊ हटवार आणि पोलीस पाटील अरविंद निंबेकर उपस्थित होतेया वेळी लेखराम चांदेवार, टिकाराम इठोले, पद्माकर बोरकर, युराज काशीवार, बिरळद काशीवार, बिरगडे बोरकर यांच्यासह मुंगुलमारे परिवार, मित्र परिवार व पट समितीचे सदस्य यांचे सहकार्य लाभले. लावलेल्या सर्व वृक्षांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.


0 टिप्पण्या