चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:- जिल्ह्यातील हंडरगुळी येथील शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे एकल महिलांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.गेल्या तिन वर्षांपासून अनेक विविध उपक्रम राबविले जातात.गेल्या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये दहा हजार वह्यांचे वाटप करण्यात आले यंदा ही चाकुर, अहमदपूर, उदगीर तालुक्यातील काही शाळांमध्ये पंधरा हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.तसेच सामाजिक कार्यात सक्रिय मदत असते.चाकुर व परभणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रंगरंगोटी साठी आर्थिक मदत संस्थेकडून करण्यात आली.पालखी सोहळ्यासाठी एक लाख रुपये किंमतीचा साऊंड सिस्टीम देण्यात आली.दिपावलीमध्ये गोड फराळाचे वाटप करण्यात येते.असे विविध उपक्रम संस्थेकडून राबविले जातात त्यामधील हा एक आहे.
संस्थेचे अध्यक्ष अशोक बापुराव केदासे हे मुंबई येथे उद्योजक आहेत.जिवनात संघर्ष करुन यशाचे शिखर गाठले म्हणून त्यांना तळागाळातील लोकांच्या व्यथांची जाणीव आहे.कुठलाही फंड न घेता स्वतः हा संस्थेचा वतीने उपक्रमांच्या माध्यमातून मदत करतात.
काल हंडरगुळी येथील शिवाजी माध्यमिक विद्यालय एकल महिलांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी संघर्ष सेवाभावी संस्थेचे सचिव लक्ष्मीकांत मोरे अध्यक्ष होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डि.एम.तांबरे होते,आर.व्हि.घटकार उपस्थित होते.काही गावात जाऊन एकल महिलांच्या भेटी घेऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली,एकल महिलांचे जिवन म्हणजे हाल अपेष्ठा , आर्थिक समस्या, अत्यंत हालाखीची परीस्थिती मधुन जिवन जगत असतात.कुठला सण, धार्मिक विधी असेल तर आणखी त्यांना निमंत्रण दिले जात नाही.रुढी परंपरा नावाखाली आणखी सदैव अपमान केला जातो.अशा परिस्थिती मध्ये त्यांना फुल नाही फुलांची पाकळी म्हणून पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.त्यामध्ये वह्या, दोन पेन, कंपास,पाणी बॉटल, कलर बॉक्स, चित्रकला वही, पेन्सिल शॉपनर रबर,अशा वस्तू देऊन मदत करण्यात आली.
सुत्रसंचलन दिपक कांबळे यांनी केले तर प्रस्ताविक आनंद कंजे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नंदा होळकर , पंचशिला चौधरी,सुरेखा हल्लाळे,मिरा कांबळे,दिपा मोगले, सोनाली कल्ले,मनिषा राजपेठे आदींनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या