चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-भंडारा जिल्ह्यातील सर्व कलावंत संस्था मिळून एक महासंघ तयार करण्यात आला आहे. त्या महासंघाला भंडारा जिल्हा संयुक्त कलाकार महासंघ असे नाव देण्यात आले. हा महासंघ जेव्हा कलावंतांवर अन्याय अत्याचार होत आहे अशा वेळी या महासंघाच्या वतीने न्याय मिळवुन देण्यासाठी संगीतमय आंदोलन, धरणे आंदोलन, अशा विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. म्हणून आज अस्मितेचा एल्गार कार्यालय भंडारा येथे परमानंद मेश्राम सामाजिक चळवळीचे नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत या महासंघाची कार्यकारिणी तयार करण्यात आली. त्यामध्ये एक उडी येथील कलावंत भावेश कोटांगले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानंतर संपूर्ण कार्यकारणी गठीत करण्यात आली ती याप्रमाणे उपाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम बोंदरे, सचिव गणेश आथीलकर, सहसचिव नत्थू बांते ,कोषाध्यक्ष सोमप्रभू तांदुळकर,संचालक अमित हारगुडे, उमेश भोयर, लक्ष्मीकांत मेश्राम, अंबादास नागदेवे, नाशिक चवरे, मारोती निंबार्ते, शत्रुघ्न वैद्य यांची निवड करण्यात आली. तसेच या महासंघाच्या वतीने ३१ आगस्ट २०२६ ला कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी भव्य संगीतमय आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वस्तरीय कलावंतांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धायावेळी करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या