चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-घाणोड येथील सामाजिक कार्यकर्ता विजय साखरे यांची गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. घाणोड ग्रामपंचायत अंतर्गत गावसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. या गावसभेत तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड आणि इतरही विषयांचा सर्वांगीण समावेश होता. पार पडलेल्या या ग्रामसभेत प्रथम विजय साखरे यांची निवड करण्यात आली. यापूर्वी विजय साखरे घाणोड ग्रामपंचायतचे पदाधिकारी राहिलेले आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत घाणोड ग्रामपंयतच्या वतीने गावकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले होते. त्यामुळे त्यांची उत्तम कारकीर्द बघता गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा भार त्यांच्याकडे सोपविण्यात आला. गावकऱ्यांच्या वतीने आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


0 टिप्पण्या