चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- जिल्ह्यात ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक व सचिव म्हणून कार्यरत राहिलेले, हसतमुख व मनमिळावू व्यक्तिमत्त्वाचे श्री.अतुल वर्मा यांचा ६३ वा वाढदिवस त्यांच्या समस्त योगसाधकांनी मोठ्या हर्षोल्हासात व गरिमामय वातावरणात साजरा केला. योग भारती बहुउद्देशीय संस्था तथा पतंजली योग समिती (संभाजी गार्डन) यांच्या संयुक्त विद्यमाने शिवापर्ण टॉवर येथे या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. अतुल वर्मा हे दररोज पहाटे ५ वाजता उठून योग व प्राणायामाच्या वर्गाला नियमितपणे उपस्थित राहतात. कोणत्याही योगसाधकाचा वाढदिवस असो किंवा अन्य कोणताही प्रसंग असो, आपल्या दमदार वक्तृत्वाने सूत्रसंचालन करत आपल्या मिश्कील अंदाजात ते सर्वांची मने जिंकतात. प्रत्येकाला हसतमुखाने व तल्लीनतेने भेटणे आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष वैशिष्ट्ये आहेत.ते सर्वांचे लाडके व अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत.
त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सत्कारमूर्ती श्री. अतुल वर्मा यांचा शाल, श्रीफळ तसेच ग्रीन हेरिटेज संस्थेच्या वतीने पर्यटनविषयक पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. रत्नाकर तिडके होते. प्रमुख योगशिक्षक श्री. शाम कुकडे यांच्यासह मारोती पुडके, माधवराव फसाटे, वामन गोंधुळे, टेंभुर्णे, वालदे, चिंधुजी बुधे, वसंत कुर्वे, पी. पी. लांजेवार सर, उद्धव डोरले, रामेश्वर येळणे, गुरुप्रसाद पाखमोडे, डोकरीमारे, के. झेड. शेंडे, मोहन अग्रवाल, सुधीर गुप्ता, अनिल शेंडे, पुरुषोत्तम समरीत, शेख, शिवराम बारई, राधा गुप्ता, रेखा वासनिक आदी योगसाधक व योगसाधिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आपल्या मनोगतातून श्री.अतुल वर्मा यांच्या कार्याची व गुणांची प्रशंसा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.ते महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघचे राज्य सल्लागार व महा.राज्य ग्रा.प.अधिकारी यूनियनचे माजी राज्य सरचिटणीस असून अनेक संघटनांशी ही ते संलग्न आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शाम कुकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन चिंधुजी बुधे यांनी मानले.


0 टिप्पण्या