सासरा-सानगड़ी मार्गावरील घटना ; शव विच्छेदनानंतर वन विभागाने नर्सरी परिसरात केले दफन
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:- सासरा-सानगड़ी मार्गावर शनिवार दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका हरणाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात थोडावेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मृत हरीणाचे वय जवळपास एक ते दीड वर्ष असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार हरिण रस्ता ओलांडत असताना कोणत्यातरी अज्ञात वाहनासमोर आले व गंभीर जखमी झाले. थोड्याच वेळात घटना स्थळीच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच साकोली व सानगड़ी वन विभागाच्या चमू घटना स्थळी पोहोचल्या. अधिकारी आणि कर्मचारी यांनी मृत हरिणास आपल्या ताब्यात घेवून नियमानुसार कारवाई सुरु केली. सानगड़ीचे पशु चिकित्सक डॉ. अडकणे यांनी मृत हरिणाचे पोस्टमार्टम केले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हरिणास सानगड़ी स्थित नर्सरी परिसरात नियमानुसार दफण केले. यावेळी क्षेत्र सहायक असलम शेख, वनरक्षक विशाल भदाडे, गिरधर पाखमोडे, सुरेश खंडागडे यांच्या सह अन्य कर्मचारी व मजूर उपस्थित होते.
*वन्यजीवांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित
सासरा-सानगड़ी मार्गाच्या वन क्षेत्र असल्याने या मार्गावर नेहमीच वन्यजीवांची आवाजाही सुरू असते.रस्ता ओलांडताना अनेकदा वन्यजीव वाहनाच्या समोर येण्याचा धोका असतो. हरिणाच्या मृत्यूच्या घटनेनंतर पशुप्रेमीनी वन क्षेत्रातून जाणाऱ्या वाहन चालकानी सावधानपूर्वक और नियंत्रित गतीने वाहन चालविण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे सकाळी आणि सायंकाळच्या वेळी वन्यजीवांची आवाजाही असलेल्या मार्गावर वाहन चालकानी अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे.
अज्ञात वाहनाची ओळख व वाहनचालक यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई संदर्भात वन विभागातर्फे चौकशी सुरू आहे.


0 टिप्पण्या