Ticker

6/recent/ticker-posts

श्री रेणुकादेवी मंदिर परिसरातील कलाकंदाच्या गुणवत्तेची तपासणी करा; अन्यथा आंदोलनतहसीलदारांना विनोद सुर्यवंशी पाटील यांचे निवेदन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
माहूर :-श्री रेणुकादेवी मंदिर परिसरातील व्यापारी संकुलात विक्री होत असलेल्या कलाकंदाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारी असून, या कलाकंदाची तात्काळ अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करावी, अशी मागणी शिवसेना तालुका संघटक विनोद सुर्यवंशी पाटील यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कलाकंदाची विक्री केली जाते. सदर कलाकंदामध्ये पाम तेल, डालडा, रवा, विविध पावडर तसेच इतर पदार्थांची भेसळ केली जात असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या कलाकंदाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
 श्री रेणुकादेवी मंदिरात दूरवरून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अनेक भाविक उपवास व व्रत करून मंदिरात येत असल्याने मंदिर परिसरात विक्री होणाऱ्या कलाकंदची शुद्धता व गुणवत्ता महत्त्वाची आहे. कथित भेसळयुक्त कलाकंद सेवन केल्यामुळे भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कलाकंदाचे नमुने घेऊन तपासणी करावी, भेसळ आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी तसेच मंदिर परिसरातील कलाकंदची  नियमित तपासणी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
या प्रकरणात तातडीने कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही विनोद सुर्यवंशी पाटील यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.
 “ शिर्डी साईबाबा मंदिर, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगीगड वणी येथे  कलाकंद विक्री बंद करण्यात आली असून त्या धर्तीवर माहूरगड येथील भेसळयुक्त कलाकंद विक्री बंद होणे आवश्यक आहे” 
 -विनोद सुर्यवंशी पाटील शिवसेना तालुका संघटक, माहूर जि. नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या