Ticker

6/recent/ticker-posts

मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा परिवार ठाणे कडून पुरस्कार!

विजेत्यांमध्ये डॉ.विनय दांदळ व विजया भांगेंचा समावेश 

प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर

चंद्रपूर : ठाणे येथील मनस्पर्शी साहित्य ,कला व क्रीडा परिवार कडून उत्तम व दर्जेदार साहित्यलेखनासाठी काही साहित्यिकांना पुरस्कार देण्यात आले आहेत.
ह्या पुरस्कार मध्ये प्रामुख्याने डॉ.विनय दांदळ व महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य लेखिका विजया भांगे यांचा समावेश आहे.
त्यांच्या वैचारिक लेखांची नोंद घेत लागोपाठ त्यांना तिसऱ्या वर्षी पुरस्कृत करण्यात आले आहे.हे येथे उल्लेखनीय आहे.
विजया भांगे ह्या मुळच्या अमरावती जिल्ह्यातील पथ्रोटच्या रहिवाशी असून यापूर्वी त्यांनी सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिकांची भूमिका अतिशय उत्तमपणे बजावली आहे.
दरम्यान त्यांना उपरोक्त पुरस्कार बहाल झाल्याबद्दल सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा धोटे, शैला चिमड्यालवार, साधना धकाते,रंजू दिलीप मोडके, नलिनी आडपवार व सहज सुचलच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या