(आदिशक्ती शीतला माता मंदिर ट्रस्ट चा स्तुत्य पुढाकार) (लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजन)
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:-आदिशक्ती शीतला माता मंदिर ट्रस्टच्या वतीने स्थानिक निशा विद्यालय,भंडारा येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दि:01/08/2026 रोजी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले. ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री बी.एन. टेंभुर्णे होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिशक्ती शीतला माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व समाजसेवक श्री ईश्वरलाल जी काबरा, श्रीमती इंदिरादेवी काबरा, ट्रस्ट.चे उपाध्यक्ष श्री सत्यनारायणजी व्यास, ग्रीन हेरिटेजचे संस्थापक मोहम्मद सईद भाई शेख यांच्यासह शिक्षक,शिक्षिका वृंद उपस्थित होत्या .
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर अतिथींचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय श्री सी.एस. राहांगडाले यांनी सादर केले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व,परिश्रम व शिस्त याबाबत प्रेरणादायी विचार मांडले. त्यानंतर अतिथींच्या हस्ते गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन पूजा उके मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पी.एच. लांजेवार, जे.डी. बोकडे, अपेक्षित तुरस्कर व श्री येळणे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री लांजेवार यांनी उपस्थित सर्व अतिथी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. राष्ट्रभक्ती गीत ‘वंदे मातरम्’ च्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


0 टिप्पण्या