~~~~~~~~~~~~~~~~~~
रस्त्यावरती भटकणारा,
कोणी नाही त्याचा,
भुकेने व्याकुळ जीव,
डोळ्यात अश्रूंचा साठा.
निराधार, अनाथ, बेवारस,
वृद्ध आणि दिव्यांग,
समाजाने विसरले त्यांना,
पण माणुसकी अजून जिवंत.
"मानवसेवा हीच ईश्वरसेवा",
हा मंत्र घेऊन आली,
सर्वधर्म समभाव प्रभुसेवा,
आशेचा हात पुढे केली.
अंघोळ, वस्त्र, अन्नदान,
औषध आणि प्रेमाची ऊब,
रुग्णालयापर्यंत सोबत,
कुटुंबाचा शोध घेते मायबाप.
जात-धर्म न पाहता,
फक्त माणूस पाहते ती,
शेकडो जीवनात फुलवते,
पुन्हा एकदा हास्याची कळी.
आज आश्रमाची गरज आहे,
निवारा द्यायला हात हवे,
दानशूरांनो पुढे या,
माणुसकीचा दिवा तेवत ठेवा.
भुकेल्याला अन्न द्या,
आजाराला औषध द्या,
बेवारसाला सन्मान द्या,
हीच खरी ईश्वरपूजा.
चला करूया मिळून यज्ञ,
माणुसकीचा हा पवित्र,
कारण माणसासाठीची सेवा,
हेच ईश्वराचे सर्वोत्तम तीर्थ.
मानवसेवा हीच ईश्वरसेवा
सर्वधर्म समभाव प्रभुसेवा स़स्था, चंद्रपूर
~~~~~~~~~~~~~~~~~
राजेश येसेकर
मु.पो.ता.भद्रावती. जि. चंद्रपूर
मो. 7756963512


0 टिप्पण्या