राजेश लोखंडे तालुका प्रतिनिधी इगतपुरी जिल्हा नाशिक मो.नं.7666690892
इगतपुरी:- तहसील कार्यालय येथे इगतपुरी त्र्यंबकेश्र्वर तालुक्याचे लोकप्रिय आमदार हिरामण खोसकर ,इगतपूरी तालुक्याचे तहसीलदार परमेश्र्वर कासुळे यांच्याकडून तालुक्याच्या विविध गोष्टीचा आढावा घेतला.यात अतिवृष्टी,घरांची पडझड,भात शेतीचे नुकसान,त्यांचे पंचनामे त्वरित केले पाहिजे कृषी विभागाची कार्यशाळा झाली पाहिजे,तसेच रेशन कार्ड,नवीन दुय्यम प्रत,संजय गांधी निराधार,पेन्शन योजना,अश्या योजनांचा लाभ तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला भेटला पाहिजे अश्या अनेक महत्वाच्या प्रश्नांसंधर्भात चर्चा झाली.या चर्चेत इगतपुरी त्र्यंबकेश्र्वर तालुक्याचे लोकप्रिय आमदार हिरामण खोसकर साहेब,इगतपूरी तालुका तहसीलदार परमेश्र्वर कासुळे , आमदार साहेबांचे स्वीय सहाय्यक शिवाजी मोराडे ॲड संदीप डावखर उपस्थित होते.


0 टिप्पण्या