दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
बीड :-जमिनीच्या तुकड्याच्या वादातून केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाणे हद्दीतील तट बोरगाव ता अंबाजोगाई येथे सख्ख्या दोन भावात तुंबळ भांडणेझाली आहेत या भांडणात एका भावाने दुसऱ्यावर धारदार कत्तीने वार केला . तर दुसऱ्याने चक्क दाताने ओठाचा लचका तोडला आहे . या प्रकरणी दोघांच्याही फिर्यादी वरून एकमेकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत . केज तालुक्यातील युसूफवडगांव पोलिस ठाणे हद्दीतील तटबोरगाव ता . अंबाजोगाई येथे जमिनीच्या वादातून अंगद धोंडीराम शितोळे आणि हरिदास धोंडीराम शितोळे या दोन सख्ख्या भावा भावात दि . २३ नोव्हेंबर रोजी भांडण झाले . अंगद धोंडीराम शितोळे याने युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , त्याच्या नावावर तट बोरगाव शिवारात शेत गट नं . २८ मध्ये ५७ गुंटे शेत आहे . त्यांच्या शेता शेजारी त्याचा सख्खा भाऊ यांचे शेत आहे . दि . २३ रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याचे सुमारास अंगद व त्याची पत्नी शुंभागी असे त्यांच्या घरी असताना त्याचे भाऊ हरीदास धोंडीराम शितोळे , दुशांत धोडीराम शितोळे , भावजई वर्षाराणी हरीदास शितोळे , वंदना हरीदास शितोळे , पुतणे अभिजित दुशांत शितोळे , महेश हरीदास शितोळे व किरण हरीदास शितोळे हे त्याच्या घरासमोर आले शिवीगाळ करू लागले व दुशांतधोडीराम शितोळे , भावजई वर्षाराणी हरीदास शितोळे , वंदना हरीदास शितोळे , पुतणे अभिजित दुशांत शितोळे , महेश हरीदास शितोळे व किरण हरीदास शितोळे हे त्याच्या घरासमोर आले शिवीगाळ करू लागले व दुशांत शितोळे हा म्हणाला की , तु आपले जमीनीच्या वाटणीचे बाँडवर सही कर . तुला आम्ही जमीन देणार नाहीत . असे म्हणुन घराचा दरवाजा तोडुन ते सर्वजण घरात घुसून त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली . तेंव्हा त्याची पत्नी शुभांगी ही त्यांना म्हणाली की , तुम्ही माझे नवऱ्याला का मारता ? असे म्हणुन भांडण सोडवत असतांना दुशांत याने त्याचे हातातील लोखंडी कत्तीने शुभांगी हिचे डावे डोळ्याचेवर मारून दुखापत केली . तसेच दुशांत याने त्याचे हातातील लोखंडी कत्ती नाकावर मारून दुखापत केली . हरिदास शितोळे यांने त्याचे हातातील लाकडी दांडा डोक्यात मारून दुखापतत केली . व वर्षाराणी शितोळे , वंदना शितोळे हिने शुभांगी हिचा हात धरून चापट बुक्यांनी मारून मुक्कामार दिला व अभिजीत , महेश , किरण यांनी त्याला व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून मुक्कामार दिला . तसेच तिच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे पट्टी गंठण तोडुन भावजई वर्षाराणी घेतले . यापुढे आमच्या नादाला लागताल तर तुम्हाला आम्ही जिवंत सोडणार नाहीत . अशी जिवे मारण्याची धमकी देवुन निघुन गेले . या प्रकरणी अंगद धोंडीराम शितोळे यांच्या तक्रारी वरून हरीदास धोंडीराम शितोळे , दुशांत धोडीराम शितोळे , वर्षाराणी हरीदास शितोळे , वंदना हरीदास शितोळे , अभिजित दुशांत शितोळे , महेश हरीदास शितोळे , किरण हरीदास शितोळे सर्व रा . तटबोरगाव ता . अंबाजोगाई यांच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु . र . नं . २०४ / २०२२ भादं . वि . १४३ , १४७ , १४८ , १४ ९ , ३२४ , ३२७ , ४५२ , ३२३ , ४२७ , ५०४ , ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे .


0 टिप्पण्या