रामपुरी येथील घटना
लक्षावधी रुपयाचे धान वाया
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-लाखनी तालुक्यातील रामपुरी येथे रात्रीचे सुमारास अचानक हत्तीचे कळपाने जंगला शेजारील शेताकडे आपला मोर्चा वळवून शेतात जमा करून ठेवलेल्या धानाच्या पुजन्याची प्रचंड प्रमाणात नुकसान करून धानाचे पेंडके शेतात इतरत्र फेकल्याची घटना शनिवारी(ता.३) सकाळचे सुमारास उघडकीस आली. जंगली हत्तीच्या कळपाचा तीन चार दिवसापासून बरडकिन्ही व रामपुरी परिसरात धुमाकूळ सुरू असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी लाखनी चे अधिनस्त असलेल्या वनरक्षक बीट रामपुरी व बरडकिन्ही येथील नियतक्षेत्र रेंगेपार/कोहळी, चिचटोला, शिवणी येथील शेतकऱ्यांच्या धानाचे पूजने व ऊस वाडी पाठोपाठ रामपुरी येथील वन क्षेत्रालगत असलेल्या शेतजमिनीकडे आपला मोर्चा वळवून अरुण श्रावण फुल्लुके, पतीराम कारू भालेराव, विजय मुकुंदा तरोणे, आनंदराव मंगल तरोणे यांच्या शेतात मळणीसाठी ठेवलेल्या धानाच्या पुजन्याचे अंदाजे दीड ते २ लक्ष रुपयाचे नुकसान केले असून या प्रकाराने या नुकसानग्रस्त धान उत्पादकांवर उपासमारीची पाळी आली आहे. तर वित्तीय संस्थांकडून घेतलेले पीक कर्ज कसे फेळावे या विवंचनेत हे शेतकरी आहेत. महसूल व वन विभागाने ह्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेतातील पुजन्याच्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देणे गरजेचे झाले आहे.
*हत्तींच्या चितकाराणे गावकरी भयभीत(चौकट)*
तालुक्यात मागील ४ दिवसापासून हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. शुक्रवारी मध्यरात्रीचे सुमारास हत्तीचा कळप गावालगत असलेल्या शेतशिवारात आला व चितकार करीत धानाचे पुजन्याचे नुकसान केले. चितकार गावकऱ्यांचे कानी पडताच हत्तीचा कळप गावात तर येणार नाही ना.? या भीतीपोटी गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)*
तालुक्यात मागील ३ ते ४ दिवसापासून संख्येने २३ असलेला हत्तीचा कळप शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहे. तर जंगला लगत असलेल्या गावातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या हत्तीच्या कळपाचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी.
*आकाश कोरे, माजी जि. प. सदस्य*


0 टिप्पण्या