Ticker

6/recent/ticker-posts

सरपंचाच्या ५१ जागांसाठी १९३ तर सदस्याच्या ४६४ जगांकरिता १००१ नामांकन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- लाखनी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या नामांकन पत्र स्वीकारण्याचे शेवटच्या दिवशी सरपंचाच्या ५१ जागांसाठी १९३ उमेदवार तर १६० प्रभागातून ४६४ ग्रामपंचायत सदस्यांचे जागांकरीता १००१ नामनिर्देशन पत्रे भरण्यात आले असून मतदान केंद्राची संख्या १६९ आहे. तर ७३ हजार १४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी २२ निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नेमणूक करण्यात आल्याचे तहसीलदार महेश शितोळे, नायब तहसीलदार धर्मेंद्र उर्कुडकर यांनी सांगितले. 
          साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली .१ नगरपंचायत आणि ७१ ग्रामपंचायतीत १०४ गावे समाविष्ट आहेत . ७१ पैकी ५१ स्वतंत्र तर २० गट ग्रामपंचायती आहेत . तालुक्यातील स्वतंत्र ग्रामपंचायतीचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२२ मध्ये संपला असल्याने तालुक्यांत ५१ ग्रामपंचायती मधील १६० प्रभागातून ४६४ सदस्यांची निवड होणार आहे. त्यात २३२ महिलांचा समावेश असून अनुसूचित जातीचे ८२ , अनुसूचित जमातीचे २१ , नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी) ५८ तर सर्वसाधारण गटातून २५२ ग्रामपंचायत सदस्य निवडून येणार आहेत त्यापैकी ४७,१४,४१,१३० महिला सदस्य निवडून येणार आहेत .तर अनुसूचित जाती ९ , जमाती ४ , नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी) १३ आणि सर्वसाधारण २५ असे सरपंचासाठी आरक्षण निश्चिती करण्यात आले आहे त्यापैकी अनुसूचित जाती ६ , जमाती १, ना.मा.प्र. ६ व सर्वसाधारण १४ अशा २७ ग्रामपंचायतीत महिला राज येणार आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याचे शेवटच्या दिवशी सरपंचाचे ५१ जागेकरिता १९३ आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या ४६४ जागाकरिता १००१ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले असून ७३ हजार १४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ३६ हजार ७७५ पुरुष तर ३६ हजार ३६९ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याकरिता १६९ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. असे तहसीलदार महेश शितोळे, नायब तहसीलदार धर्मेंद्र उर्कुडकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या