Ticker

6/recent/ticker-posts

विदयार्थ्यांना शिक्षणातून आदर्श नागरिक बनता आले पाहिजे :- श्रीम.बेल्हेकर मॅडम

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-  आज जि.प. प्रा .केंद्र शाळा पाटोदा ता. जामखेड येथे हळदी कुंकू व महिला मेळावा संपन्न झाला .
   या प्रसंगी शालेय विदयार्थ्यानी  क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले , राजमाता जिजाऊ याच्यां जीवनावर भाषणे केली .
कार्यक्रमाच्या प्रमूख पाहुण्या श्रीम .बेल्हेकर मॅडम ( माहिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पं.स. जामखेड ) यांनी महिला व किशोरवयीन मुली यांच्या आरोग्य विषयी मोलाचे मार्गदर्शन केले .
तसेच विदयार्थ्यानां मार्गदर्शन करतानां त्या म्हणाल्या कि विदयार्थ्यानी अंगी शिस्त बाळगली तर तो जीवनात यशस्वी होतो . त्यापुढे म्हणाल्या कि शिक्षण हे नोकरी मिळावी म्हणून न करता चांगला आदर्श नागरिक बनण्यासाठी घ्यावे .  यावेळी प्रबोधनपऱ गीते महिलानी सादर केले .विविध खेळाच्या स्पर्धाचे आयोजन केले होते . महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला .
   या प्रसंगी प्रास्ताविक मुख्या . उत्तम पवार सरांनी केले . श्रीम . राठोड मॅडम , श्रीम . कुमटेकर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी शा . व्य . समितीच्या उपाध्याक्षा सौ . छाया लंघे ह्या होत्या . सुत्रसंचलन श्रीम . कांबळे मॅडम यांनी केले . तर आभार श्रीम . हजारे मॅडम यांनी मानले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या