Ticker

6/recent/ticker-posts

रोपवाटीकेतील निम्म्यापेक्षा अधिक रोपे जगलीच नाही ---!


 पाथरी/साकोली रोपवाटीकेतील प्रकार


 क्षेत्र सहाय्यकाचे अक्षम्य दुर्लक्ष

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा- क्षेत्र सहाय्यकासह स्थानिक वनकर्मचाऱ्यांनी पाथरी/साकोली रोपवाटीकेतील रोपांचे आवश्यक तेव्हा निंदन केले नाही तसेच वेळेवर खतांची मात्रा ही देण्याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केल्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक रोपे जगलिच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. अंदाजपत्रकानुसार खर्च न करता खर्च केल्याचे दाखवून शासकीय रकमेचा अपहार करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर वन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करून अपहार केलेली रक्कम वसूल करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी केली आहे. 
      साकोलीच्या प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा अधिनस्त वन कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे अनागोंदी कारभार सुरू असल्याचे उत्तम उदाहरण पाथरी/साकोली रोपवाटिका आहे.   २०२१-२२ ह्या आर्थिक वर्षात पाथरी/साकोली येथे १२ लक्ष ८हजार रुपये अंदाजपत्रकीय रकमेच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ५० हजार मिश्र रोपवाटिकेस मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यात ५० टक्के सागवान , १० टक्के बांबू ,२० टक्के फळझाडे आणि २० टक्के इतर रोपांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एस. चौहान प्रसूती रजेवर गेल्याने प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मेंढे यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहायक सुनील खांडेकर आणि वनरक्षक एस. जी. जाधव यांचे देखरेख व सनियंत्रण रोपवाटिकेवर होते 
     अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार पिशवीतील रोपांना पाणी देणे , पॉलिथिन पिशवीतील रोपांचे निंदन, कीटकनाशक फवारणी , पाणी देऊन माती भुशभुशीत करणे तथा रोपांचे संगोपन व देखभालीवर ६ लाख १० हजार रुपये खर्च अपेक्षित होता पण वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने अंदाजपत्रकातील तरतुदींना तिलांजली देऊन कागदोपत्री खर्च दाखवून स्वतः चा स्वार्थ  साधल्यामुळे रोप वाटीकेत निम्म्यापेक्षा अधिक रोपे जगलीचं नसल्याचा सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी आरोप केला असून याप्रकाराणे शासकीय निधीत वन अधिकाऱ्याकडून अफरातफर केल्याची दिसून येते असल्याचे त्यांचे म्हणणे आहे .सार्वजनिक रकमेचा अपहार करणाऱ्यावर कारवाई करून अपहार केलेली रक्कम वसूल करावी अशी मागणी कैलास गेडाम यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या