Ticker

6/recent/ticker-posts

जामखेड येथे बहुजन मुक्ती पार्टीची नवीन कार्यकारणी निवड मोठ्या जल्लोषात पार पडली .

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-   जामखेड येथे बहुजन मुक्ती पार्टी फादर बॉडी व बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडीच्या निवडीसाठी बहुजन मुक्ती पार्टी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी व बहुजन मुक्ती पार्टी पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष माननीय अमोल लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या जल्लसात मिटींग पडली.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय शिवाजी भोसले यांनी समस्त कार्यकर्त्यांना मोठ्या पोट तिडकीने कष्टकरी व मजूर यांच्यावर होणाऱ्या अन्याय व कामगारांच्या समस्या यावर मार्गदर्शन केले 
         या मिटींगचे नियोजन माननीय विनोद शिरसाठ जिल्हाउपाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी अहमदनगर व परमेश्वर मोरे यांनी केले होते तर या मीटिंगचे प्रास्ताविक व  मार्गदर्शन विनोद शिरसाठ यांनी केले
         या मिटींगला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय अमोल लोंढे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना बहुजन मुक्ती पार्टीचे ध्येय उद्देश  कार्यकर्त्यांना समजावून सांगितले त्याचबरोबर बहुजन मुक्ती पार्टीतच का यायचं याविषयी मार्गदर्शन केले मार्गदर्शन करत असताना या देशाचा राजा हा  राणीच्या पोटातून जन्माला येत नाही तर तो मतपेटीतून जन्माला येतो असे सांगितले तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला त्यानंतर कार्यकर्त्यांचे बी एम पी विषयी असणाऱ्या शंका कुशंका व प्रश्न यांना सविस्तर व समाधानकारक उत्तरे दिल्याने कार्यकर्त्यांचा जोश वाढवून मोठ्या संख्येने कार्यकर्ते बहुजन मुक्ती पार्टीमध्ये सामील झाले 85 टक्के बहुजनांच्या बहुजन मुक्ती पार्टीमध्ये मोठ्या हिरारीने काम करू अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी यावेळी दिली .
      यावेळी बहुजन मुक्ती पार्टी जामखेड तालुका अध्यक्ष म्हणून शिवराम पवार व तालुका उपाध्यक्ष  विशाल किसन आव्हाड तर बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी तालुका अध्यक्ष म्हणून गंगाराम माणिक घोडेस्वार तर उपाध्यक्ष म्हणून परमेश्वर मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली तर गणेश घायतडक यांची सचिव व कृष्णा पौळ संघटक तर माणिक शिवदास बोडके, बाळासाहेब सिताराम राजगुरू, सतीश पवार, आणि  हनुमंत मोरे, जयसिंग खवळे, यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
      यावेळी आशिर पठाण ग्रामपंचायत सदस्य पाटोदा,  संतोष बबन गव्हाळे ,मयूर आव्हाड, धनवे सर व अनिल बाबर हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या