Ticker

6/recent/ticker-posts

खरा तो एकचि धर्म,भ्रष्टाचार करावा!


खरा तो एकचि धर्म,
भ्रष्टाचार करावा!

     जळगाव शहरातील पांच लाखात शंभर माणसे प्रामाणिक मिळालेत तर शंभर दिवसांत जळगाव जागृत करू शकतो.चोर नेत्यांनी कितीही पैसा वाटला तरीही मतदारांनी भुलून जाऊ नये.मागील पांच वर्षात सफाईचा मक्ता, रस्त्याचा निधी, बांधकाम मंजुरी ,रेतीचा धंदा यातून नगरसेवकांनी खूप कमवले आहे.आजपर्यंत मत खरेदी केले.पुन्हा खरेदी करू‌.अशी तयारी चालू आहे.जळगांवच्या मतदारांची नस नगरसेवकांनी,आमदारांनी, मंत्र्यांनी ओळखली आहे.काही नगरसेवक तर गर्वाने सांगतात,कि मी कोणत्याही प्रभाग मधून निवडून येऊ शकतो.मी कोण आहे?मी काय काम केले?हे सांगण्याची गरज नाही.हे पैसे कोणाकडून आले ? इतकेच सांगायची गरज आहे.प्रभागमधील सर्वच मतदारांचे फोन नंबर मिळतात.त्यांना सांगून ठेवतात कि, आज माझी माणसे तुमच्याकडे येतील.यादीत तुमचे घरातील नांवे पाहून तुमचे तुम्हाला मिळतील.मिळाल्यावर मला फोन करा.आणि मतदान केल्यावर सुद्धा मला फोन करा.जर कोणी राहून गेले तरीही पैसे मिळतील.नक्कीच मिळतील.
    इतका आत्मविश्वास या नगरसेवकांचा बनला आहे.कोणत्या कॉलनीत पैसा पाठवायचा, कोणत्या कॉलनीत स्वतः जाऊन हात जोडायचा,याचा बारीक अभ्यास या नगरसेवकांना झाला आहे.म्हणून ते पांच वर्षे प्रभागात फिरकत सुद्धा नाहीत.काम करणे तर दूरच,काही तर जळगाव ला सुद्धा राहात नाहीत.तरीही निवडून येतात.जळगांव जिल्ह्यातील अनेक गावांचे सरपंच आणि सदस्य त्या गावात राहात नसतांना निवडून आले आहेत.काही  महिलांना मतदारांनी कधीही पाहिली नसतांना झेडपी सदस्य निवडून दिले आहे.सासू एका शहरात नगरसेविका तर नवरा दुसऱ्या शहरात नगरसेवक.यांचे चेहरे फक्त निवडणूकीतील बैनर वर दिसतात.बस्स!
      जळगाव शहरातील आणि जिल्ह्यातील ही परंपरा ,ही मानसिकता मोडून काढणे आवश्यक आहे‌.आम्ही जेंव्हा जेंव्हा जनतेत जातो ,बोलतो कि , तुम्ही मताचे पैसे घेतले म्हणून नगरसेवक रस्ते बनवत नाहीत.तर प्रत्येक माणूस आणि बाई म्हणते ,पैसे वाटणारे आमच्या पर्यंत आलेच नाहीत.म्हणून आम्ही मत द्यायला गेलोच नाहीत.आम्ही काय चूक केली,कोणीतरी सांगितली पाहिजे.हिच चूक आम्ही मतदारांना सांगतो.कि,बापा हो!पैसे नाही मिळाले तरीही मत दिले पाहिजे.
    काही लोक म्हणतात,कोणी सक्षम उमेदवार असला तर आम्ही विचार करू.आम्ही विचारतो,सक्षम म्हणजे कशाबाबतीत सक्षम ?  ‌तर चक्क निर्लज्जपणे सांगतात कि,याने पांचशे दिले तर दुसऱ्याने किमान सातशे तरी दिले पाहिजे.तरच नगरसेवक बदल होऊ शकतो.नगरसेवक बदलाची, जळगाव बदलाची ही संकल्पना बदलणे आवश्यक बनले आहे.तेच काम आम्ही जागृत जनमंच करीत आहोत.
     आम्ही जळगाव मधील कॉलनीत जातो तेंव्हा तेथील नगरसेवक स्वताहून सांगतो कि,हा बघा, रस्ता.बोला याबाबतीत.आम्ही तसे बोलायला तयार झालो, सुरूवात केली तर तो नगरसेवक दूर होतो.मी नको , तुमच्या पिक्चर मधे यायला.मी तुमच्या सोबत दिसलो तर माझी अडचण होऊ शकते.पुन्हा पक्षाचे तिकीट मिळणार नाही.तुम्ही बोला.बरोबर बोलत आहात.काय हा कोडगेपणा? असे कोडगे नगरसेवक पुन्हा निवडून येऊ नयेत म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत.
     जळगाव शहर सर्वच जाती धर्माचे लोकांचे आहे.धार्मिक विषयावर,जातीच्या विषयावर त्यांच्यात मतभेद आहेत.पण भ्रष्टाचार बाबत त्यांचे एकमत आहे.आतापर्यंत कोणत्याही नगरसेवकाने दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांचा भ्रष्टाचार उघड केला नाही.जसे किरीट सोमय्या करतात.भाजप सोडून दुसऱ्या पक्षातील चोरांचे कि असेना पण फार्म हाऊस शोधून काढतात.प्लॅस्टीकचा कि असेना पण हातोडा घेऊन फार्म हाऊस तोडायला जातात.पण येथे सर्वच नगरसेवकांचा एकच धर्म आहे.
 खरा तो एकचि धर्म,
  भ्रष्टाचार करावा !
 हा धर्म बुडीत घालायचा आहे.म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे.जनतेला जागृत करणे.जळगांव जागृत जनमंच.महाराष्ट्र जागृत जनमंच.
     काही हितचिंतक तर म्हणतात,काका हे जळगाव बदलणार नाही.तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही.मला नाऊमेद करता कि,आणखी काही.पण मी उत्तर देतो,मला वाटते, जळगाव बदलू शकतो.आधी तुम्ही तर बदला.अशा मित्रांना बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे.


.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या