मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो, 9860179256
उस्मानाबाद :-दिनांक 19 जानेवारी बहुजन समाजातील जवळपास पंधरा हजार जाती समुहात विखुरलेल्या छोट्या मोठ्या जाती समूहांनी विचार करावा काय 1950 पूर्वी आपल्या बाप जाद्यांना या देशांमध्ये धन संचय करण्याचा, विद्या घेण्याचा,विविध क्षेञात नोकऱ्या करण्याचा, मनाला आवडेल तो उद्योग/व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य होते का....
आपण भारतीय संविधानातून मिळालेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा उपभोग घेत आपल्या घर आणि परिवारामध्ये कोणत्याही धर्माचं पालन करा त्यात काहीच गैर नाही.परंतु रस्त्यावर आणि सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर आपणास ज्या ग्रंथामुळे,ज्या संविधानामुळे सर्व मूलभूत अधिकार मिळाले आहेत.त्या अधिकारांच्या संरक्षणासाठी आपण सर्व प्रकारच्या आंदोलनासाठी तयार असले पाहिजे....
⏭️ बहुजन समाजातील अनेक जातीमध्ये विभागलेल्या तमाम जाती समूहांनी लक्षात घ्यावे,आपल्या कॅटेगिरी किंवा जाती जरी वेगवेगळ्या असल्या तरी समस्या मात्र एकच आहेत.आपण सर्व "जन" अन्न,वस्त्र,निवारा, आरोग्य,शिक्षण,उद्योग, व्यवसाय,शिक्षणातुन नोकरी,रोजगार यासाठी सतत धडपडत असतो.हे सर्व आपल्याला 1950 नंतर संविधानाने दिलेले आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने भारतीय संविधानाने दिलेल्या मताधिकाराच्या बळाचा योग्य वापर करून,भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांची शंभर टक्के अंमलबजावणी करणाऱ्या परिवर्तनवादी राजकीय पक्षां सोबतच राहिले पाहिजे किंवा संविधानवादी विचाराचे सरकार स्थापण करण्यासाठी प्राणांतिकपणे प्रयत्नशील असले पाहिजे आणि आपले मूलभूत अधिकार नाकारणाऱ्या मनुवादी आणि गांधीवादी पक्षांना नाकारण्याचे धाडस केलं पाहिजे....
26 जानेवारी 1950 पूर्वी भारतामध्ये बहुजन समाजाला "धन" संचय, "शस्ञ"बंदी, "विद्या" बंदी यांच अतिशय कठोरपणे पालन करावे लागत होते.किंबहुणा कोणी जर मनुस्मतीच्या या नियमाचा भंग करून धन,शस्ञ,विद्या प्राप्त केलीच तर त्या व्यक्तीला मनुस्मृती प्रमाणे जाती निहाय शिक्षा ही करण्यात येत असे,मग त्या शिक्षेची दहकता जातीच्या थरावर आधारित असे.भारतामध्ये हजारो वर्षापासून अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, अनेक धार्मिक,राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत.परंतु या सर्व स्थित्यांतरामध्ये प्रमुख वाद एकच होता तो म्हणजे "समता" की "विषमता" हा होय.समता आणि विषमता यांचे युद्ध कायम स्वरूपी भारतामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून आणि विषयानुरूप चालूच राहिले आहे,ते आज ही चालूच आहे.जस जसे काळ लोटत चालला होता तस तसे "क्रांतीने" जोर धरून आधुनिक भारताच्या सुरुवातीलाच भारत देशाने आपलीच हजारो वर्षांपूर्वीची "लोकशाही युक्त गणराज्य" पद्धतीचा स्वीकार केला.तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 होय.या देशातील आणि या पुरोगामी महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरिकांनी (SC/ST/OBC तील जाती समुहांनी ) सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे की 1950 पूर्वी आपली सामाजिक स्थिती व दर्जा काय आणि 1950 नंतर आपला सामाजिक बदल व दर्जा काय ? यामधील जो प्रवास आहे,जो सामाजिक धार्मिक,राजकीय,सांस्कृतिक, औद्योगिक इत्यादी मूलभूत घटकांमध्ये विभागला गेला आहे.हा प्रवास कशा पद्धतीने आपण करत होतो आणि आज करत आहोत,हा मूलभूत अंतर आपण लक्षात घेतला पाहिजे.1950 पूर्वी या देशांमध्ये प्रत्येक माणसाला त्याच्या त्या नाव घेण्यासही लाज वाटणाऱ्या "जातीच्या" नावानं,धर्माच्या नावानं ओळखण्यात येत होते आणि त्याच जाती आणि धर्माच्या आधारावर त्या त्या माणसांना सामाजिक,धार्मिक,राजकीय, व्यावसायिक,सांस्कृतिक, शैक्षणिक अधिकार या देशातील तथाकथित मनुस्मृती चालवणाऱ्या माणूसच असणाऱ्या पण विचाराने ब्रह्म-राक्षस असणाऱ्या "ब्राह्मण" व ब्राह्मण्यशाहीने दिले होते.मग आज आपण 2023 मध्ये विचार करत असताना,आपण विचार केला पाहिजे की,26 जानेवारी 1950 नंतर आपल्या जीवनामध्ये सामाजिक, धार्मिक,राजकीय,सांस्कृतिक, व्यावसायिक,औद्योगिक, शैक्षणिक या मूलभूत घटकांमध्ये कोणता बदल झालेला आहे.हा बदल समजून घेण्यासाठी या भारतातील,या पुरोगामी महाराष्ट्रातील ज्याला आपण बहुजन समाज म्हणतो,जो या देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये 85% आहे.हा बहुजन समाज म्हणजे कोण ? हे संवैधानिक भाषेतून काय आणि आपल्या बोली भाषेमधून काय हे ही आपण समजून घेतले पाहिजे. सर्वप्रथम आपण संवैधानिक भाषेमधून बहुजन समाज म्हणजे काय हे समजून घेऊ. या देशांमध्ये राहणारा,या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहणारा ज्याला भारतीय संविधानकारांनी हजारो वर्षापासून ज्याची सामाजिक, राजकीय,धार्मिक,शैक्षणिक, व्यावसायिक परिस्थिती यांचे अन्वेषण करून लोकशाही भारतामध्ये या समूहाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींची तरतुद करत यांना "मूलभूत अधिकारांची" अत्यंत आवश्यकता असल्याची जाणीव होऊन,या देशातील हजारो वर्षापासून पीडित असलेल्या मूळच्या भारतीयांना शेड्युल कास्ट म्हणजे SC समाविष्ठ केले.आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात 59 जाती तर सबंध भारतातून जवळपास 1500 जातींचा हा शेड्युल कास्ट अर्थात SC चा जात समूह आहे.तर दुसऱ्या बाजूला शेडूल ट्राईब आहे,ज्याला सवैधानिक भाषेमध्ये या समूहाला शेडूल ट्राईब (ST) म्हणतो,या वर्गात भारतातील 750 पेक्षा जास्त जातींचा समुह शेड्युल ट्राईब म्हणुन ओळखतो.या ST च्या जातींना एकत्रित करून विकासाच्या प्रवाहात, "मूलभूत अधिकारांच्या" प्रवाहात संविधानकारांनी आणले.तर तिसऱ्या बाजूला या देशातील सवर्णांच्या गावगाड्याला उपयुक्त म्हणुन "स्पृश्य" असलेले,परंतु मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या गुलामच असलेले.जे या देशात छोठ्या मोठ्या अशा एकुण 6500 पेक्षा जास्त जातींमध्ये विखुरले गेलेले, ज्यांना आपण संवैधानिक भाषे मध्ये (OBC)ओ.बी.सी समाज म्हणतो, हा ओ.बी.सी "स्पृश्य" समाज असला तरी या ही समाजाला "धन,शस्त्र, आणि विद्याबंदी" प्रामुख्याने लागू करण्यात आलेली होती. अशा या तिन्ही घटकाच्या वर्गाला मिळून आपण या देशातील बहुजन समाज असे म्हणतो.हा बहुजन समाज सातत्याने राजवट कोणाची हे असो,सातत्याने पिळला आनं छळला गेला,गुलामीतच ठेवला गेला.ब्राह्मण व ब्राह्मण्यवादाने स्वार्थासाठी यांचा कधी धार्मिक गुलाम म्हणुन तर कधी हत्यार/शस्ञ म्हणुन वापर केला गेला.हा ओ.बी.सी समाज आज ही आपण पाहतो की,विकासाच्या आणि शैक्षणिक प्रगतीच्या प्रवाहामध्ये कोसो दूर आहे. त्याच बरोबर या देशातील काही ठराविक धर्म मार्तंडाच्या ठेकेदारीपासून,जुलमापासुन इतर धर्मीयांच स्वातंत्र्य अबाधित राहावं,यासाठी संविधानकारांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशात राहणाऱ्या अनेक धर्मियांच्या धर्मांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करत त्यांना ही "धार्मिक स्वातंत्र्य" बहाल केले.त्यामुळे मूळ मुद्दा असा निर्माण होतो की,आज ज्या प्रकारे संवैधानिक लोकशाहीच्या आधारावर या देशांमध्ये कपटनीतीने,गैरमार्गाने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मतांच्या ध्रुवीकरणातुन सरकार स्थापन करण्यात येत आहे.या सरकारने देशातील बहुजन समाजाच्या मूलभूत अधिकारावर "गदा" आणण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केलेला आहे.ते म्हणजे या बहुजन समाजाला हजारो वर्षापासून "धन,शस्त्र आणि विद्याबंदी" करण्यात आलेली होती त्याच प्रमाणे आज पुन्हा एकदा या देशातील RSS ची पिलावळं आणि त्यांचेच भारतीय जनता पार्टीचे सरकार या देशातील बहुजन समाजांना धन,शस्त्र आणि विद्या बंदी "खाजगीकरणाच्या" माध्यमातून करण्याचे षडयंत्र जवळपास यशस्वी करण्याच्या मार्गावर आहेत.आपण वर उल्लेख केलेल्या एस.सी/ एस.टी आणि ओ.बी.सी च्या एकजुट वर्गातील विविध जाती समूहांनी विचार करावा,काय आपल्या पूर्वजांना या पुरोगामी महाराष्ट्रात आणि या देशात सम्मानाचा सामाजिक दर्जा,शैक्षणिक अधिकार, व्यावसायिक अधिकार,विविध क्षेञात नौकर्यांचे अधिकार व "आरक्षण/प्रतिनिधीत्व" होते का ? काय आपण "धन" संचय करू शकत होतो काय ? आपण किमान आपल्या तरी आई-बहिणीच्या अब्रुचे रक्षण करण्यासाठी "तलवार" उचलू शकत होतो काय ? आपण आपल्या देशाच्या संरक्षणासाठी "तलवार" चालवु शकत होतो का ? या सर्व प्रश्नांचा विचार आपण शांत डोक्याने करावा, म्हणजेच आपल्या लक्षात येईल की,भारतीय संविधानातील "मूलभूत अधिकाऱ्याने" आपल्या जीवनामध्ये आजच्या स्थितीला सामाजिक,धार्मिक, राजकीय,शैक्षणिक आणि व्यावसायिक काय परिवर्तन घडवून आणले आहे,याची आपल्याला चांगल्या प्रकारे जाणीव होईल.आपण बघत आणि भोगत होतो,सनातनी (वैदिक धर्म) धर्माच्या चतुवर्ण्य व्यवस्थेमध्ये "शूद्र" आणि "अतिशूद्र" वर्गाच्या लोकांना कोणत्याच प्रकारचे अधिकार नव्हते.शूद्र वर्गातील अर्थात ओ.बी.सी च्या (ओ.बी.सी.मराठा इत्यादी पुर्वाश्रमी चातुवर्ण्य व्यवस्थेप्रमाणे "शुद्रच" ठरतात. ब्राह्मण,वैश्य,क्षञिय,शुद्र,अतिशुद्र ) हजारो जाती,हजारो जातीतील लोकांना वाटत होते की आपण व आपला "स्पर्श" इतरांना अर्थात उच्चवर्णीयांना चालतो,म्हणजे आपण ही "स्पृश्य हिंदू" आहोत.परंतु ज्या ज्या वेळी "हक्क आणि अधिकारांची" वेळे येत होती, प्रसंग येत होते,त्या त्या वेळी मात्र या स्पृश्य हिंदूनाही तुम्ही "गुलाम" असल्याची जाणीव करून देण्यास ही सनातनी व्यवस्था कधी ही मागे सरकत नव्हती आणि आज ही सरकत नाही.हे विदारक सत्य जोपर्यंत छोट्या छोट्या जातीमध्ये विखुरलेल्या सर्व बहुजन समाज लक्षात घेत नाही, तो पर्यंत आपल्याला भारतीय संविधानाने मिळालेल्या "हक्क आणि अधिकारांचे" महत्त्व काय हे आपल्या लक्षात येणार नाही, हे आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे.आधुनिक भारतामध्ये, भारत देशातील तमाम बहुजन समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणारा "भारतीय संविधान" नावाचा मूलभूत ग्रंथ आहे.तो बहुजन समाजाचा हक्क व अधिकारनामा आहे.जो कोणाशीच कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. कोणत्याही माणसाला, व्यक्तीला विकासाच्या संधी पासून रोखत नाही.ही गोष्ट आपण नीटपणे समजून घेऊन रक्षण "धर्माचे" करावे ही संरक्षण "संविधानाचे" करावे हे आपणास ठरविता आले पाहिजे.कारण आपणच सनातन्यांचे शस्ञ म्हुणुन या देशांमध्ये,या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हजारो वर्षापासून बेगडी धर्माचे आणि फसव्या,माणुसकी नाकारणार्या,मानवी मुल्यांना पायदळी तुडविणार्या,मानवतावाद नाकारणार्या धर्म तत्त्वज्ञानाचे संरक्षण करत "समता" वाद्यांचे अनेक मूडदे पाडले आहेत.हा काळा इतिहास सुध्दा आपण लक्षात घ्यावा,कारण या देशांमध्ये संत कबीर असतील, संत तुकाराम असतील किंवा आजच्या काळातील अनेक समतावादी,परिवर्तणवादी महापुरुष असतील.या सर्वांचा खून करण्याचं काम आपणच इथल्या सनातनी व्यवस्थेच्या मानसिक गुलामीतून केलेले आहेत.हे आपण नीटपणे लक्षात घ्यावे.त्यामुळे आज स्थितीला आपल्या पिढ्यानं पिढ्याच्या हिताचे संरक्षण करणाऱ्या भारतीय संविधानामुळे आपल्या जीवनात अमुलाग्र बदल घडून आलेल्या या भारतीय ग्रंथाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आज या देशातील बहुजन समाजावर येऊन पडलेली आहे.ही जबाबदारी आपण योग्य रीतीने पार पाडण्याचं काम केलं पाहिजे.अन्यथा आपल्या नंतर येणारी पिढी ही सूटबूट टाय घालून गुलामी करणारी असेल.हे लक्षात घ्या कारण आज आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून छोट्या छोट्या प्रकरणातून लक्षात येते की,खाजगीकरणाच्या सपाट्यामधून, खाजगीकरणाच्या ब्रह्मराक्षसाच्या तावडीतून आपण स्वतःला मुक्त करू शकत नाहीत.हे या पन्नास वर्षातील अनेक लढायांच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. ओ.बी.सींच्या नोकऱ्याचा प्रश्न असेल,ओ.बी.सीच्या जनगणनेचा प्रश्न असेल, अदिवासींच्या जमिनीचा प्रश्न असेल,मागासवर्गीयांच्या शिक्षण,नोकऱ्याचा प्रश्न असेल,धार्मिक अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाचा प्रश्न असेल,असे अनेक प्रश्न या खाजगीकरणाच्या सपाटा लावलेल्या सरकारमध्ये आपण सोडवू शकत नाहीत. हे आपल्याला वारंवार दिसून येत आहे.त्यामुळे आपण सर्वांनी भारतीय संविधानाचा गौरव करून आपल्या जीवनामध्ये भारतीय संविधानामुळे खूप असे बदल झालेले आहेत,खूप असे परिवर्तन आलेले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे खूप असे "मुलभूत अधिकार" आपल्या सर्वांना मिळालेले आहेत.त्यामुळं भारतीय संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी कोणत्याही प्रकारचा मनामध्ये जाती भेदभाव न ठेवता एकजुट होवुन संविधानाप्रमाणे सरकार न चालविणार्या सत्ताधार्यांना दणका दिला पाहिजे.खर तर आपण जो आप-आपसामध्ये जातीभेद करतो,आपणा सर्वांनाच "शूद्र/अतिशुद्र" म्हणणारा ब्राह्मण वर्ग आहे.हे ही आपण नीटपणे लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये भारतीय संवैधानिक लोकशाहीच्या माध्यमातुन देशामध्ये सरकार निर्माण करण्याचा अधिकार आपल्या सर्वांना संविधानानेच दिला आहे,आपण हा आपला अधिकार कोणत्याही धर्माचे संरक्षण करण्यासाठी नाही तर मानवतावादाचे संरक्षण करणार्या भारतीय संविधानाच्या संरक्षण करण्यासाठी वापरला पाहिजे. बेशक आपण आपल्या घर परिवारामध्ये कोणत्याही धर्माचे पालन करा किंवा करत असाल परंतु ज्यावेळी आपण आम नागरिक म्हणून,भारतीय नागरिक म्हुण रस्त्यावरती येतो,सार्वजणिक जीवनात येत असतो,दैनं-दिन व्यवहारांमध्ये जीवन जगत असतो. अशा वेळी मात्र आपण आपल्या "हक्क आणि अधिकारांचे" संरक्षण करणाऱ्या "भारतीय संविधानाचे" संरक्षण करण्याचं "कर्तव्य" आपण पार पाडलं पाहिजे.संविधान दिवस, प्रजासत्ताक दिवस हे दिन आपल्या हक्क अधिकाराचे अंमलबजावणी करण्याचे दिवस आहेत,भारतीय संविधान हे आपल्या प्रत्येकांप्रती अर्पित केलेला महान ग्रंथ असुन या हक्क आणि अधिकाराच्या दिवसांचे महत्त्व आपण लक्षात घेऊन आपण सण आणि उत्सवाप्रमाणे या दिवशी आपण रस्त्यावरती येऊन या संविधानाच्या समर्थनामध्ये आपण जयघोष केला पाहिजे. तरच आपण येणाऱ्या काळामध्ये मनुवादी विचाराच्या,गांधीवादी विचाराच्या सरकारच्या तावडीतून आपल्या पिढीला, आपल्या समाजाला आणि आपल्या देशाला वाचू शकतो.


0 टिप्पण्या