Ticker

6/recent/ticker-posts

मुलींनी आपला उंबरठा सांभाळणे काळाची गरज

साहित्यिक प्रा. विजयाताई मारोतकर यांचे प्रतिपादन 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- साहित्य जर नवीन जीवन देणारे नसेल तर ते साहित्यच नाही. तसेच स्त्री जीवनाचेही आहे. मुलींनी कपडे एवढे घालावे की समाज सत्कार करेल अन्यतः बलात्काराचा ससेमीरा सुटणार नाही. त्यामुळे मुलींनी आपला उंबरठा सांभाळणे काळाची गरज असल्याचे मराठी भाषा पंधरवाडा निमित्त महामार्ग पोलीस केंद्र गडेगाव व राष्ट्रीय सेवा योजना महिला तक्रार निवारण समिती  आयोजित कार्यक्रमात समर्थ महाविद्यालय लाखनी येथे "पोरी जरा जपून" या विषयावर मार्गदर्शन करतांना साहित्यिक व कवयित्री प्रा. विजयाताई मारोतकर यांनी सांगितले. 
             सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले यांच्या संकल्पनेतून महामार्ग पोलिस मदत केंद्र गडेगाव तथा समर्थ महाविद्यालय लाखनी चे संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवाडा निमित्त राष्ट्रीय सेवा योजना महिला तक्रार निवारण समिती व विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे सौजन्याने नुकतेच "पोरी जरा जपून" या विषयावर साहित्यिक व कवयित्री प्रा. विजयाताई मारोतकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, प्रमुख अतिथी समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे, पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, महामार्ग पोलिस निरीक्षक वैशाली वैरागडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. धनंजय गिरेपुंजे, मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. बंडू चौधरी, महिला तक्रार निवरण समिती प्रमुख डॉ. संगीता हाडगे, सामाजिक कार्यकर्ता मीरा बारई, मुख्य मार्गदर्शक साहित्यिक व कवयित्री प्रा. विजया मारोतकर यांचे प्रमुख उपस्थितीत समर्थ महाविद्यालयाचे प्रांगणात घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मुलींनी काय करावे.  काय करू नये. या बाबद सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले, संचालन प्रा. पद्मजा कुलकर्णी, तर आभार डॉ. संगीता हाडगे यांनी मानले. कार्यक्रमास लाखनी शहरातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक नितीन आगासे, सावरकर तसेच पोलिस कर्मचारी आणि समर्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंदांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या