Ticker

6/recent/ticker-posts

रोहयोच्या मुजरांना आता लावावी लागणार दोन वेळा ऑनलाइन हजेरी...

बोगस मजुरीला बसणार पायबंद , २० पेक्षा जास्त मजुरांसाठी नियमावली............

गौतम सोनवणे.जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो
8308128457


औरंगाबाद :- पैठण रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. आता या कामावरील मंजुरांना दोन वेळा ऑनलाईन हजेरी लावावी लागणार आहे. केंद्र सरकारने नुकत्याच याबाबत शासनादेश काढला असून २० पेक्षा जास्त मजूर ज्या ठिकाणी कामावर असतील त्या ठिकाणी हा नियम लागू होणार आहे. रोजगार हमी योजनांमध्ये काम करताना मजुरांची कामे यंत्राच्या सहयाने करून मजुराच्या नावावर पैसे उचलले जात असल्याचे प्रकार यापूर्वी अनेक वेळा घडले आहेत. त्यामुळे या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, हे गैरप्रकार रोखण्यासाठी शेवटी केंद्र शासनाने ऑनलाईन दोन वेळा नोंदणीचा नियम आणला आहे. प्रत्यक्ष कामावर असलेल्या मजुरांना दोन वेळा ऑनलाइन हजेरी लावावी लागणार आहे. नॅशनल मोबाईल माॅनेटरिंग सिस्टमच्या माध्यमातून रोहयोच्या मुजरांची कामे पारदर्शकपणे पार पाडणार आहे. या नियमावलीनुसार ज्या कामावर २० पेक्षा जास्त मजूर असतील अशा ठिकाणी अक्षांश आणि रेखांश ठिकाणावर जाऊन मंजुरांनी होत असलेल्या कामाचे फोटो काढायचे आहेत. दोन वेळेस फोटो ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत, सकाळी कामावर रुजू होतात, आणि दुपारी मध्यंतरीच्या काळात मंजुरांची हे फोटो संबंधितांना डाउनलोड करावे लागणार आहेत. यामुळे प्रत्यक्ष मजूर कामावर आहे की, नाही हे काम कुठे सुरू आहे, हा परिसर कोठे आहे, याची संपूर्ण माहिती प्रशासनाला कळणार आहे. तसेच ऑनलाईन फोटो घेतल्यामुळे कामकाज किती झाले दिवसभरात किती काम पार पडले याची सगळी माहिती रोहयो कार्यालयाकडे उपलब्ध होणार आहे. दर आठ दिवसांनी हा संपूर्ण माहिती तपासल्यानंतर संबंधित मंजुरांच्या बँक खात्यात पैसे वळते होणार आहे.

१०० गावात होणार कामे सुरू,

पैठण तालुक्यातील जवळपास १०० गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे मंजूर आहेत ग्रामपंचायत नियोजना नुसार काहि ठिकाणी कामे सुरू, तर काही ठिकाणी सुरू होणार आहेत. मात्र नवीन नियमावलीनुसार बोगस कामांना आता आळा बसणार असून यातून प्रत्यक्ष काम करण्याचा मंंजुरालाच याचा लाभ होणार आहे.

बोगस मजुरांना बसणार आळा,

शासनाने घातलेल्या नवीन नियमानुसार दोन वेळा रोहयोच्या मजुरांना ऑनलाईन हजेरी दाखवावी लागणार आहे, यामुळे यापूर्वी होणाऱ्या बोगस कामांना आता आळा बसणार आहे. कामे प्रभावितपणे  करता येणार आहे, कुठे किती काम झाले, याची इत्थंभूत माहिती प्रशासनाला मिळणार आहे.

संदिपान भुमरे रोहयो  व फलोत्पादन मंत्री

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या