चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975
बीड: - बीड शहरातील इंदिरानगर नगर रोड भागातील रहिवाशांना महसूल खात्याच्या वतीने काही दिवसापूर्वी आपलं घर गायरान जमिनीवर आहे ते तीस दिवसांच्या आतमध्ये पाडा अथवा आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा प्रकारच्या नोटीस देण्यात आल्या होत्या त्यामुळे त्या भागातील रहिवाशी भारत अवचार हे तणावग्रस्त परिस्थितीमध्ये होते. आपल्याला आपलं घर खाली करून बेघर व्हावे लागेल या भीतीपोटी त्यांनी विषारी औषध पिऊन त्याठिकाणी आत्महत्या केली. त्या कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट दिली व सांत्वन केले, नंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे म्हणाले की, इंदिरानगर ही वस्ती बीड शहरात चाळीस वर्षांपूर्वी वसलेले असून ती गायरानवर नसून बांधकाम विभागाच्या जागेवर वसलेली आहे. त्या जागेचा पीटीआर संबंधित लोकांना देण्यात आलेला आहे, ती मंडळी नगरपरिषदेची घरपट्टी नळपट्टी दरवर्षी भरतात. त्या जागेवर शासकीय रमाई घरकुल योजनेतून घरकुल देखील मंजूर करण्यात आलेले आहेत. मग ते अतिक्रमणधारक कसे ठरू शकता ? सरकारच्या परिपत्रकानुसार सरसकट बीड तहसीलने कुठलीही शहनिशा न करता नोटीस बजावण्यात आल्याने एका निरपराध व्यक्तीचा जीव गमावला गेला. याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निषेध करतो व तात्काळ ज्या अधिकाऱ्यांनी त्या चुकीच्या नोटीस दिल्या आहेत त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी व्हावी, व भरत अवचार च्या कुटुंबाला शासन स्तरावर आर्थिक मदत देण्यात यावी. अशा प्रकारची मागणी आम्ही शासनाकडे करत आहोत.
या शिष्टमंडळात वंचितचे शहराध्यक्ष लखन जोगदंड, जिल्ह्याचे पदाधिकारी पुरुषोत्तम वीर, अनंतराव सरोदे, बालाजी जगतकर, शेख युनुस, एस एस सोनवणे, बबनराव वडमारे, ॲड.अनिता चक्रे, पुष्पाताई तुरुमारे, नंदा भंडारे आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या