• पेंढरी येथील घटना
• ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324
भंडारा :- दुचाकी ला मागेहून येणाऱ्या आयसर कंपनीच्या सिल्वर रंगाच्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने बापलेक जखमी झाल्याची घटना सोमवारी(ता.३१) सायंकाळी ७:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. जखमी चे नाव पद्माकर कुसुमाकर काळे(३९) व अनुप पद्माकर काळे(१४) दोघेही रा. पेंढरी, तालुका लाखनी अशी आहेत. लाखनी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
पद्माकर काळे हा आपल्या जूपीटर स्कूटी क्रमांक एमएच ३६ एजे ६३०६ ने गॅस सिलेंडर घेऊन मुलगा नामे अनुप काळे याचे सोबत घरी येत असताना मागेहून येणाऱ्या आयसर कंपनी च्या सिल्वर रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ एल २०९८ ला जोडलेले हिरव्या रंगाचे ट्रॉली क्रमांक एमएच ३६/९५५० च्या चालकाने स्कूटी ला मागेहून धडक देऊन पद्माकर काळे व मुलगा अनुप काळे यास जखमी करण्यास कारणीभूत झाल्याचे जखमी वडिलाचे तोंडी रिपोर्ट व ग्रामीण रुग्णालय लाखनी चे वैद्यकिय अधिकारी यांच्या वैद्यकिय अहावलावरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ३००/२०२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून कलम २७९, ३३७ भादवि तथा मोटारवाहन कायदा सहकलम १८५ अन्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाने तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या