Ticker

6/recent/ticker-posts

सांग सांग भोळे~नाथ, बंद कमरेमे ठरले काय?

जळगाव महापालिका नगरसेवकांंनी भाजपची मलिन प्रतिमा उजळ करण्यासाठी उपोषण केले.साखळी उपोषण.भुके प्यासे उपोषण नाही. शोलेची स्टोरी लिहायला घेतली पण शुटींग झाली बैजू बावराची.
दिलके आरमां ,
आसुओमें बह गये !
   तिकडे शहराचे आमदार विधानसभेत रडले,म्हणे जळगाव मनपा आयुक्त आम्हाला एनओसी देत नाहीत.काय आमदार आहेत?म्हणे आयुक्त ऐकत नाहीत.हा झाला पहिला एपिसोड.
    इकडे त्यांनी आपल्या नगरसेवकांना उपोषण ला बसवले.दिवसभर भुकेले राहाणे!काय पाप केले बिचाऱ्यांनी?ओला दुष्काळ ?ही स्क्रिप्ट चांगली लिहिली खरी पण एण्ड मात्र चुकीचा झाला.हा झाला दुसरा एपिसोड.
    जळगाव शहरातील जनतेने या उपोषणाला पाठिंबा देणे तर दूरच.पण जमेल तसे पोस्ट मार्टेम केले.म्हणून ज्यांचा फोटो, आमदार भोळेंचा ,बैनरवर लावला नाही ,त्यांचे हातून उपोषण सोडून घ्यावे लागले.हे स्क्रिप्ट मधे लिहीलेले नव्हते.हा झाला तिसरा एपिसोड.
   यापेक्षा भयानक परिस्थिती ओढवली, ती मंत्री गिरीश महाजन यांनी हात वर केले.म्हणे मला जळगाव मधे काय चालले आहे,ते माहीती नाही.बाप रे!हे तर भलतेच झाले.द्रोणाचार्यांना न विचारता महाभारत युद्ध सुरू केले की काय?पण उपोषण चे नायक म्हणाले की, आम्ही गिरीश महाजन यांना सर्वच सांगितले होते.तरीही नरो वा कुंजरो वा! युधिष्ठिर चा डॉयलॉग द्रोणाचार्य बोलून गेले.स्क्रिप्ट ची पाने अदलाबदल झालीत की काय?हा झाला चौथा एपिसोड.
    आयुक्त गायकवाड या ऐकत नाहीत, ऐकून घेत नाहीत.म्हणून अविश्वास ठराव आणू.पण उपोषणाला लिंबू पाणी पाजणारेच तीर्थ यात्रेला निघून गेले.म्हणे ,
बहु पाप झाले!पुण्य करणे सक्त झाले!!
हा झाला पांचवा एपिसोड.
     शेवटचा सहावा एपिसोड मात्र जास्त भयंकर झाला.गुलाबराव पाटील, मंगेश चव्हाण यांना गेस्ट आर्टिस्ट बोलवून दरवाजा बंद करून आयुक्तांना दम दिला की,वाटा हिस्सा करार केला?हे रहस्य अजून कोणालाही कळले नाही.महाजन,मामा, गुलाबराव, चव्हाण यापैकी कोणीतरी खरे खरे जनतेला सांगावे.तोपर्यंत आम्ही जळगाव ची जनता गाणे म्हणू,
"सांग सांग भोळे ~नाथ,
' बंद कमरेमे' ठरले काय?"

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या