Ticker

6/recent/ticker-posts

रब्बी हंगाम 2023 मध्ये 4 हजार 550 हेक्टर क्षेत्रातील लागवड पूर्ण


• लाख लाखोरी पिकांना वातावरणाचा फटका

• भाजीपालाजन्य पिकांवर रोग आणि किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- लाखनी तालुक्यात खरीप हंगाम संपण्याच्या मार्गावर असून रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 6 हजार 543.67 हेक्टर आहे. रब्बी हंगामात अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य, भाजीपालाजन्य पिके व मसाला पिकांची लागवड करण्यात येते. त्यापैकी 18 डिसेंबर पर्यंत 4 हजार 550.33 हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या असल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या पीक पेरणी अहवालात नमूद असून लाख, लाखोरी व भाजीपालाजन्य पिकांना  वातावरणातील बदलाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
          साकोली व लाखांदुर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र 33 हजार 173.36 हेक्टर असून पेरणीयोग्य क्षेत्र 24 हजार 960 हेक्टर आहे. त्यापैकी 23 हजार 909.20 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड करण्यात आली होती. तर 6 हजार 543.67 हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यात अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य, भाजीपाला, मसाला पिकांची लागवड करण्यात येते. 18 डिसेंबर पर्यंत अन्नधान्य पिकात गहु 607 हेक्टर, ज्वारी 44.80 हेक्टर, मका 127.90 हेक्टर असे एकूण 779.70 हेक्टर, कडधान्यात हरभरा 906.20 हेक्टर, लाख, लाखोरी 744 हेक्टर, उडीद 345.50 हेक्टर, मुंग 312.08 हेक्टर, वटाणा 95.10 हेक्टर, पोपट 88.30 हेक्टर, मसूर 43.90 हेक्टर असे एकूण 2 हजार 535.08 हेक्टर, गळीत धान्यात करडई 43 हेक्टर, जवस 161 हेक्टर, मोहरी 77.50 हेक्टर, सोयाबीन 2.40 हेक्टर, भुईमुंग 8.30 हेक्टर एकूण गळीत धान्य 292.20 हेक्टर, मसाला पिकात धने 63.40 हेक्टर, मिरची 17 हेक्टर, कांदा 10.30 हेक्टर असे एकूण 90.70 हेक्टर, भाजीपाला जन्य पिके टोमॅटो 40.20 हेक्टर, वांगी 105.50 हेक्टर, भेंडी 207.90 हेक्टर, फुलकोबी 29.60 हेक्टर, चवळी 30.80 हेक्टर, कोथिंबीर(सांभार) 26.60 हेक्टर, पालक 25.85 हेक्टर, कारले 27.40 हेक्टर, बटाटा 1.80 हेक्टर, मिरची 95.80 हेक्टर, इतर भाजीपाला 52 हेक्टर असा एकूण भाजीपाला 643.45 हेक्टर, ऊस खोडवा 1.60 हेक्टर, सोनबोरू 110 हेक्टर, चारापिके 97.60 हेक्टर असे एकुण 4 हजार 550.33 हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. असल्याचे तालुका कृषी अधिकारी लाखनी यांचे रब्बी पीक पेरणी अहवालात नमूद आहे. वातावरणातील बदलामुळे लाख, लाखोरी व भाजीपालाजन्य पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊन नुकसानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

प्रतिक्रिया 

रब्बी हंगाम 2023 मध्ये 18 डिसेंबर पर्यंत अन्नधान्य, कडधान्य, भाजीपालाजन्य, गळीतधान्य व मसाला पिकांची 4 हजार 550.33 हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे.  वातावरणातील बदलाचा लाख, लाखोरी आणि भाजीपालाजन्य पिकास फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुधीर वरकडे, तालुका कृषी अधिकारी, लाखनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या