रवी भोंगाने साकोली
साकोली:-गणेश बोरकर हे नाव साकोली तालुक्यातील जनतेसमोर आले की प्रथम आठवितो तहसील कार्यालय. वास्तविक बघता गणेश बोरकर हे शामरावबापू कापगते कला महाविद्यालयात ग्रंथपाल पदावर कार्यरत आहेत. परंतु जेव्हा केव्हा निवडणूक जाहीर होतात तेव्हा मात्र साकोली निवडणूक विभागासमोर गणेश बोरकर यांचा चेहरा समोर येतो. संगणक तज्ञ आणि निवडणुकी विषयीची खडा न खडा माहिती त्यांच्याकडे अद्यावत असते. विशेष म्हणजे त्यांच्या या कार्यामुळे तहसीलदार उपविभागीय अधिकारी,, जिल्हाधिकारी सुद्धा गणेश यांचे कौतुक करतात. कोरोना काळात जिथे कोणी जायला तयार होत नाही तिथे गणेश बोरकर यांनी तहसील कार्यालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय कोरोना सेंटरची पूर्णपणे जबाबदारी सांभाळली आणि ती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या कार्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचविण्यास मदत झाली. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या या कार्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केले. गणेश लोकनायक बोरकर असे त्यांचे संपूर्ण नाव. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुका अंतर्गत येणाऱ्या उसराळ मेंढा हे त्यांचे मूळ गाव. लहानपणापासून शिक्षणाकरिता ते साकोलीत आले. त्यांचे निवासस्थान कापगते पाटील यांच्या वाड्यात असल्याने माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या सहवासात आले. त्यांच्या सहवासात आणि संस्कारात गणेश यांनी शिक्षणाचे आणि समाजसेवेचे धडे गिरविले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते शामरावबापू कापगते कला महाविद्यालय साकोली येथे ११९९ पासून ग्रंथालयात नोकरीवर रूजू झाले. साकोली परिसरात खूप कमी लोकांना माहित आहे की ते महाविद्यालयात नोकरीवर आहेत. सर्व लोक समजतात की ते तहसील कार्यालयाचे कर्मचारी आहेत. जवळपास २०१० पासून कोणतीच निवडणूक असो त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वात अगोदर गणेश बोरकर यांची सेवा संलग्नित करण्यात येते. कोणत्याही राजकीय व्यक्तीला किंवा सर्वसामान्यांना निवडणुकी संबंधित जुनी किंवा कोणतीही माहिती हवी असेल तर एक फोन केला तरी केव्हाही त्यांच्याजवळ ती माहिती मिळेलच याची हमी असते. २०१९ मध्ये जेव्हा कोरोना महामारी आली तेव्हा सुद्धा जीवाच्या भीतीने कोणतेच कर्मचारी समोर होऊन काम करायला तयार नव्हते. अशा वेळी गणेश बोरकर हे कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच तहसील कार्यालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय कोरोना सेंटरची पूर्ण जबाबदारी आपल्या हातात घेऊन ती जबाबदारी त्यांनी चोखपणे सांभाळली. हजारावर रुग्णांचे प्राण वाचविण्यास व त्यांना लागेल ती सेवा मदत करण्यास सतत कार्यरत होते. आज बोरकर दाम्पत्यांचा लग्नाचा वाढदिवस. यानिमित्ताने आम्ही त्यांनी आतापर्यंत केलेल्या कर्तुत्वाचा गौरव या निमित्ताने करण्याच्या शक्य तेवढा प्रयत्न केला. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या कर्तुत्वाचा आलेख आम्ही वाचकांसमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पत्रकार म्हणून केला. या निमित्ताने चित्र न्यूज मराठी नेटवर्क तर्फे त्यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा...!


0 टिप्पण्या