Ticker

6/recent/ticker-posts

अवैध दारू वाहतूक करतांना रंगेहात पकडले

• पालांदूर बस स्थानक परिसरातील घटना 

• इसमावर गुन्हा दाखल 

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज 
भंडारा :- अवैध देशी दारूची दुचाकीने वाहतूक होत असल्याचे गुप्त माहिती वरून पोलिस शिपाई नवीद पठाण सहकाऱ्यांसह बस स्थानक चौकात पेट्रोलिंग करीत असताना स्कूटी वरून अवैध दारूची वाहतूक करतांना एक इसमास रंगेहात पकडल्याची घटना मंगळवार(ता.२७ ऑगस्ट) रात्री ८:३० वाजता दरम्यान घडली. पालांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचे नाव भीमराव मदन खापरे(४०) रा. कवलेवाडा, तालुका लाखनी असे आहे. त्याचेकडून ३२ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
                        पोलिस शिपाई नवीद पठाण पोलिस ठाणे पालांदूर येथे कामकाज करीत असताना अवैध देशी दारू दुचाकीने वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता सहकाऱ्यांसह मंगळवारी रात्री ८:०० वाजताचे सुमारास पेट्रोलिंग कामी बस स्थानक चौकात उपस्थित असताना भीमराव खापरे दुचाकीसह संशयास्पद स्थितीत दिसून आल्याने स्कूटीवरील थैल्याची तपासणी केली असता ९० एमएल देशी दारूने भरलेले ८० नग प्लास्टिक टिल्लू वाहतूक नेतांना मिळून आला. त्याला परवण्याबाबद विचारणा केली असता मिळून आला नाही. त्यामुळे देशी दारूने भरलेले ८० नग टिल्लू किंमत २ हजार ८०० रुपये व होंडा ॲक्टिवा किंवा ३० हजार असा एकूण ३२ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस शिपाई नवीद अमिरखा पठाण यांचे फिर्यादीवरून पालांदूर पोलिसांनी भीमराव खापरे याचे विरोधात अपराध क्रमांक १३७/२०२४ महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम ६५(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या