Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा कार्यकारिणी गठित


कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजरत्न आंबेडकर प्रणित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची विश्रामगृह लाखनी येथे कार्यकर्ता बैठक पार पडली. सभेचे अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते, प्रमुख उपस्थितांमध्ये प्रदेश महासचिव वैभव धबडगे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, पूर्व विदर्भ प्रभारी निरज ताकसांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक तथा प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते यांनी डॉ. राजरत्न आंबेडकर प्रणित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे ध्येय, उद्दिष्ट आणि नियोजनाबाबद उपस्थित कार्यकर्त्यांना माहिती दिली. काही कार्यकर्त्यांचे समाधान न झाल्यामुळे चर्चा करण्यात आली. चर्चेअंती समाधान झाल्याने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रकाश जीवन जनबंधू, उपाध्यक्ष धनपाल उंदीरवाडे, भंडारा शहर अध्यक्ष अविनाश कोटांगले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरित पदाधिकारी व सदस्य निवडण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्षावर सोपविण्यात आली. प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते यांचे हस्ते निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते इंजि. रुपचंद रामटेके, डी.पी. बडोले, यशवंत साखरे, एम. आर. राऊत, राहुल बोरकर, सुरेंद्र बनसोड, बाळकृष्ण मेश्राम, प्रशांत शेंडे, गिरधारी गजभिये, अरविंद शेंडे, भारत गोंडाने, मनोज सांगोळे, मिलिंद शहारे, इंदल वालदे, गोवर्धन साखरे, संतोष उकनकर, सदानंद वासनिक, अनिता जनबंधू, वनिता हुमने यांचेसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश जनबंधू, सूत्र संचालन एन. व्ही. साखरे तर आभार डी.पी. बडोले यांनी मानले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या