कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नाने लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत केसलवाडा/वाघ जिल्हा परिषद क्षेत्रातील गराडा, सिपेवाडा, धानला, चान्ना इत्यादी गावात विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. या विकास कामांचे भूमिपूजन भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अभिजित वंजारी, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, पंचायत समितीच्या सभापती प्रणाली सार्वे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष योगेश झलके, प्रदेश प्रतिनिधी राजू पालीवाल, पंचायत समिती सदस्या मनीषा हलमारे, सुनील बांते, माजी जि. प. सदस्य जयकृष्णा फेंडरकर, केसलवाडा/वाघ चे सरपंच स्वप्नील बोरकर, उपसरपंच सुखदेव चौधरी, गराडा च्या सरपंच दिशा मेश्राम, उपसरपंच गीता कठाने, सिपेवाडा चे सरपंच तेजराम धुर्वे, प्रकाश वरकडे, धानला च्या सरपंच वैशाली ठाकरे, उपसरपंच संदेश इलमकर, चान्ना चे सरपंच परसराम फेंडरकर, योगेश गायधने, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून ग्रामस्थांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या व यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच सहकार्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले.


0 टिप्पण्या