Ticker

6/recent/ticker-posts

काय सांगता, डांबरीकरणाचे रस्त्यावर ४ महिन्यातच पडले खड्डे !

• न्याहारवानी/डोंगरगाव ते इसापूर रस्त्यावरील प्रकार 

• निकृष्ट बांधकामाचा उत्तम नमुना


कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज 
भंडारा :- ग्रामीण परिसरातील रस्ते विकासासाठी शासन प्रयत्नशील असून या करिता अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक तो निधीही उपलब्ध करतो. पण क्रियान्वयन यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे फलनिष्पत्ती होत नाही. याचा प्रत्यय न्याहारवानी/डोंगरगाव ते इसापूर रस्त्यावर आला. लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत मंजूर डांबरीकरणाचे कामात साहित्याचा अल्प प्रमाणात वापर केल्याने ४ महिन्यातच खड्डे पडल्याचा प्रकार उघडकीस आल्याने या रस्ता बांधकामाचे गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
                      न्याहारवानी/डोंगरगाव ते इसापूर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्यावरून आवागमन करतांना दुचाकी चालकाचे दुचाकी वरील नियंत्रण अनेक अपघात झाले. त्यात काहींना अपंगत्वही आले. गावकऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्य विद्या कुंभरे यांचे मागणीवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नाने न्याहारवानी/डोंगरगाव ते इसापूर रस्त्याचे डागडुजी करिता लेखाशिर्श ३०५४ अंतर्गत १० लक्ष रुपये निधी उपलब्ध करण्यात आला. करारनामा ग्रामपंचायत न्याहारवानी/डोंगरगाव चे नावाने असून यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग साकोली चे उपअभियंता धनंजय चांदेवार यांचे मार्गदर्शनात शाखा अभियंता शेख यांचेकडे सोपविण्यात आले होते. 
                      करारनामा ग्रामपंचायतीचे नावाने असला तरी हे डागडुजीचे काम विरोधी पक्षाचे कार्यकर्ते तथा ग्रामपंचायतीचे एका पदाधिकाऱ्यास देण्यात आले होते. आपले कोणी काही बिघडवू शकत नाही या न्यायाने त्याने शाखा अभियंता यांचेशी संगनमत करून डांबरीकरण कामात साहित्याचा अंदाजपत्रकात दर्शविलेल्या मात्रेनुरुप वापर न करता अत्यल्प प्रमाणात वापर केल्याने ४ महिन्यातच न्याहारवानी/डोंगरगाव ते इसापूर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याने या रस्त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तथा त्यांचेकडून निधी वसूल करणे आवश्यक झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या