सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
ठाणे :-कोरेगाव भीमा येथील कोरेगाव भिमा सार्वजनिक उत्सव मंडळाला खासदार नीलेश लंके साहेबांनी नुकतीच भेट दिली यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निखिल बाळासाहेब भालेराव यांनी खासदार लंके साहेबांचे स्वागत केले तसेच त्यांच्या हस्ते गणपती आरतीचा कार्यक्रम पार पडला.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निखिल बाळासाहेब भालेराव यांनी स्थापन केलेल्या मंडळाला तीन वर्ष पूर्ण झाले असून तांदळाच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेवून खासदार नीलेश लंके साहेबांनी या मंडळाची आवर्जून भेट घेतली
गणपती मंडळाचे अध्यक्ष निखील बाळासाहेब भालेराव यांनी खासदार नीलेश लंके साहेबांचा सत्कार केला,खासदार साहेबांच्या भेटीमुळे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यां मध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.यापुढे असेच सामाजिक उपक्रम राबवून मंडळाला नाव लौकीक मिळवून देणार असे मंडळाचे अध्यक्ष निखिल भालेराव यांनी नमूद केले यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी,बाळासाहेब भालेराव व ग्रामस्थ उपस्थित होते.


0 टिप्पण्या