Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी पोलीस स्टेशन तर्फे शहरात रूट मार्च

• कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवण्याचे आवाहन

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव दरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गुरूवार(ता.१२ सप्टेंबर) रोजी सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास शहरातील मुख्य मार्गांवरून पोलीस अधिक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनात तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सिडाम यांच्या नेतृत्वात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. या रूटमार्चला लाखनी पोलिस स्टेशनपासून सुरुवात झाली. पोलीस मुख्यालय भंडारा येथून आलेले आरसीपी पथक क्रमांक ०१ व ०२ चे ०४ अधिकारी व ७५ अंमलदार यांचेसह पोलीस स्टेशन लाखनी ते सुन्नी हनकी बरेल्वी मस्जिद लाखनी ते गुजरी चौक ते मोठे विसर्जन होणारे ठिकाण, शिवमंदिर तलाव वॉर्ड लाखनी येथून लाखोरी रोड कडे परत येऊन लाखनी शहराकडे केसलवाडा फाटा चौक ते मुरमाडी मार्गे ग्रामपंचायत मुरमाडी, सावरी गावातून सोमलवाडा रोड ते नगरपंचायत समोरील मोठे गणपती समोर विश्रांती घेऊन पुन्हा सिंधी लाईन चौक ते बस स्टॉप चौक वरून ८:०० वाजता पर्यत रूट मार्च करून परत लाखनी पोलिस स्टेशनमध्ये रूट मार्च आला व समारोप करण्यात आला. या रूट मार्चमध्ये दंगा नियंत्रण पथक, एसआरपी पथक, होम गार्ड पथक, लाखनी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हृदयनारायन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाने, पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे तसेच पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी सहभागी झाली होते. आयोजित रूट मार्च दरम्यान खालील सूचना देण्यात आल्या (१) गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान डी.जे. चा वापर करू नये, (२) गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान लेझर लाईट चा वापर करू नये, (३) गणेश उत्सव व विसर्जन मिरवणूक दरम्यान इतर धर्मियांचे धार्मिक भावना दुखावणार नाही असे गाणे वाजवू नये व इतर धर्मियांचे धार्मिक भावना दुखावणारे कृत्य करू नये. (४) सोशल मीडियावर प्रसारित अफवांवर विश्वास ठेवू नये (५) सोशल मीडियावर प्रसारित आक्षेपार्ह पोस्ट इतरत्र प्रसारित करू नये. तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त इतर सूचना देण्यात आल्या व शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या