Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌
‌इसवी सन २०२४ - १४ सप्टेंबर 
‌शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत  २०८०
‌भा. रा. २३ भाद्रपद १९४६.
युगाब्द ५१२६
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण 
ऋतू : वर्षा
मास: भाद्रपद 
पक्ष: शुक्ल    
तिथी: एकादशी (२०.४०) ~ द्वादशी                                    
वार:   शनिवार
नक्षत्र: उत्तराषाढा (२०.३०) ~ श्रवण                           
राशी:    मकर 

*परिवर्तिनी एकादशी*
*जलझूलनी एकादशी*
या दिवशी भगवान विष्णू व श्री गणेश यांची पूजा केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते व लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळतो अशी धारणा आहे.

*हिंदी राजभाषा दिन*
*काश्मिरी हिंदू बलिदान दिन*
*माहिती विशेष*
पाकिस्तान प्रायोजित आतंकवाद के चरम के दौर में आतंकियों ने सबसे पहले कश्मीर घाटी में कश्मीरी हिंदू  समुदाय के पेशे से वकील *पंडित टीकालाल टपलू* को निशाना बनाया। घर के बाहर जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ ) के आतंकियों ने १४ सितंबर १९८९ को गोली मारकर उनकी हत्या कर दी। पं. टीकालाल न केवल वकील थे, बल्कि भाजपा की राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य और प्रदेश उपाध्यक्ष भी थे। समाज सेवक भी थे। पिछले ३५ साल से कश्मीरी पंडित समुदाय के लोग इस दिन को बलिदान दिवस के रूप में मनाते आ रहे हैं। 

२०१७: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आज संयुक्तपणे भारताच्या पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली.
२०१५: गुरुत्वीय लहरी – गुरुत्वीय लहरींचे (gravitational waves) पहिले निरीक्षण करण्यात आले.
२००३: इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.
२०००: मायक्रोसॉफ्ट कंपनी ने विंडोज एमई रिलीज केले.
१९९७: बिलासपूर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेत ८१ जण ठार झाले.
१९७८: ’व्हेनेरा-२’ हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.
१९६०:ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कन्ट्रीज’ (OPEC) ची स्थापना झाली.
१९५९:सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.
१९४९ : हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा घोषित करून हिंदी दिन साजरा करण्यात आला.
१९४८:दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर सुमारे साडे सहाशे वर्षांनी स्वतंत्र झालेल्या किल्ल्यात भारतमातेचे मंदिर उभारण्यात आले.
१९१७:रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.
१८९३:सरदार खाजगीवाले, श्री. गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले. लोकमान्य टिळकांनी हा उपक्रम उचलून धरून त्याला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरुप दिले. ही सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात होय. तत्पूर्वी समर्थ रामदास स्वामी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव केल्याचा उल्लेख आहे.
७८६: हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.

जन्मदिवस :
१९६३: रविंद्र रामनारायण ऊर्फ ’रॉबिन’ सिंग – अष्ट्पैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक
१९४८: ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका वीणा सहस्रबुद्धे
१९३२:डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते
१९२३:राम जेठमलानी –केन्द्रीय मंत्री, कायदेपंडीत 
१९१४: भारतीय हिंदी चित्रपत सृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक जी. पी. सिप्पी 
१८६७: वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग
१७७४: भारतातील १४वे राज्यपाल जनरल लॉर्ड विलियम बेंटीक

मृत्यूदिन :
१९८९:बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक, पद्मभूषण, तांबेरा रोगाला दाद न देणार्‍या व अधिक उत्पादन देणार्‍या गव्हाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या. 
१९९८: शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राम जोशी 
२०११:हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक
२०१५: सबवे चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका

*।। दास-वाणी ।।* 

टोणपा नव्हे गुणग्राहिक । 
मूर्खास कळेना विवेक । 
विवेक आणि अविवेक । 
येकचि म्हणती  ।। 

उंच नीच कळेना ज्याला । 
तेथे अभ्यासचि बुडाला । 
नाना अभ्यासे प्राणीयाला । 
सुटिका कैची  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १७/१०/१६-१७ 

टोणपा म्हणजे दुर्गुणांची खाण असलेल्या महामूर्खाला सद्गुण म्हणजे काय हे माहितच नसल्याने गुणांची पारख नसते. त्यांची किंमत करणे तर दूरच. विवेक म्हणजे योग्य ती निवड. मूर्खाला योग्य अयोग्य समजत नाही म्हणून त्याच्या लेखी विवेक आणि अविवेक दोन्ही सारखेच.

उच्च दर्जा आणि दर्जाहीन यांमधील फरक ज्याला कळत नाही त्या खुशालचेंडूला  आपण मोठे होण्यासाठी अभ्यास करायला हवाय हे देखील पटत नाही. अज्ञानातच सुख मानणाऱ्या टोणप्याला अभ्यासाला पर्याय नाही हे कोण समजावणार ?

*टोणपसिद्धलक्षण समास*

*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*

 🙏 💐💐💐💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या