मोईन कादरी हिंगोली
वसमत : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे व जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय हिंगोली ,हिंगोली जिल्हा सिकई मार्शल आर्ट असो. यांच्या संयुक्त विदयमाने व हु. बहिर्जी स्मारक महाविदयालय यांच्या सहकार्याने इंडोअर हॉल मधे स्पर्धा संपन्न झाली.
या प्रसंगी कार्यक्रर्माचे अध्यक्ष स्थान क्रीडा अधिकारी श्री गणेश बोडखे पाटील यांनी भुषवीले तर उद्धाटक म्हणुन प्रा. श्री अनिल नादरे पाटील हु. ब.स्मा. महाविदयालय हे लाभले .
प्रमुख अतिथीपदी प्रकल्प अधिकारी सामाजकल्यान विभाग श्री सिध्दार्थ गोवंदे,हिंगोली, श्री विजयकुमार एंगडे, भीम टायगर विभागीय अध्यक्ष, श्री भीमराव सरकटे , वुशु क्रीडा चे जिल्हा सचिव श्री संजय सौदा जेष्ठ कोच , श्री संदेश टाक , जिल्हा अध्यक्ष गोपाल इसावे , क्रीडा जिल्हा अध्यक्ष विजय डोंगरे ,श्री चव्हाण सर ,शांती विदयामंदिर शिरड क्रीडा शिक्षक ,प्रा. निरंजन आकमार , विजय गव्हाणे ,शरयू मगर ,संदिप भिसे प्रहरी सैनिकी स्कुल अदि मान्यवरांची उपस्थीती होती.
जिल्हयातील शालेय खेळाडुंनी विविध वय व वजन गटात प्राविन्य मिळवुण यश संपादन केले . हु. ब. स्मा . विदयालय वसमत येथील कु. श्रधा नवघरे , श्रूती पवार तनुजा बुजवणे,
अक्षरा नवघरे , शेख सायमा
वैष्णवी आढाव ,कु. सौंदर्या मंचेवार पिरॅमिड इग्लिश स्कुल ,वसमत मुलात
निर्भय नांगरे हु. बस्मावि.
सय्यद साहील श्री गोरखनाथ विदयालय चोंढी , विट्ठल सावंत श्री सिध्देश्वर विदयालय वसमत , त्रिमुख पांचाळ ,यांची शालेय विभागीय स्तरावर निवड झाली.
स्पर्धेत पंच म्हणुन श्री गोपाल इसावे ,संतोष नांगरे ,विजय डोंगरे , शेख मोईन ,सिध्दार्थ पडिंत , शितल लाटे , शेख तौफीक , अनिल टाकणखार , यांनी भुमीका पार पाडली .
यशस्वी खेळाडुंचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री राजेश्र्वर मारावार , श्री आत्माराम बोथीकर ,श्री गणेश बोडखे ,श्री निळकंठ श्रावण , मुख्याध्यापक श्री प्रविण शेळके, श्री कच्छी सर ,श्री ज्ञानोबा भोसले क्रीडा शिक्षक यांच्या सह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर कौतूक करत आहेत .
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष नांगरे यांनी तर आभार प्रदर्शन गोपाल इसावे यांनी केले .


0 टिप्पण्या