Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस अधीक्षक कार्यालय येथे गणेश मंडळाची बैठक संपन्न

मोईन कादरी हिंगोली
हिंगोली:- जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली दि. १२/०९/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली येथे गणेश मंडळाच्या पदाधिका-यांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये गणेश उत्सव संदर्भाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शांततेत उत्सव साजरा करण्यासंदर्भाने पोलीस अधीक्षकांच्या वतीने मंडळाच्या पदाधिका-यांना सुचना देण्यात आल्या.

जिल्हयातील सर्व गणेश मंडळांची शासकीय पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी, मिरवणुक मार्गाची पाहणी करून काही अडथळा असल्यास संबंधीत पो.स्टे. ला कळवावे, कायद्याचे उल्लंघन करून ध्वनी प्रदुषण करू नये, जातीय तेढ निर्माण करणारी गाणी लावु नये, डिजे व लेजर लाईट शो चा वापर करू नये, मिरवणुकीमध्ये स्वतःची प्रकाश व्यवस्था असावी तसेच इतर धार्मिक स्थळासमोर मिरवणुक रेंगाळत राहणार नाही याची दक्षता घ्यावी, मिवणुकीत गुलालाचा अधिक वापर होणार नाही तसेच मुर्तीची उंची कमी असावी, मिरवणुकीमध्ये वापरले जाणारे वाहन व चालक योज्य असावे, मिस्वणुकीत स्वतःचे स्वयंसेवक असावेत, मिरवणुकीतील कार्यक्रम, मिरवणुकीचा वेळ मिरवणुकीचा मार्ग याबाबत पो.स्टे. ला कळवावे, मिरवणुकीत दोन मंडळात वाजवी पेक्षा जास्त अंतर ठेवु नये तसेच फटाक्यांचा वापर करू नये, विवादित घोषणा देवु नये, मुर्ती सांभाळण्यासाठी योग्य व्यक्ती ठेवावी, दारू पिलेल्या व्यक्तींना मिरवणुकीत प्रवेश देवु नये, विसर्जन स्थळापासुन लहान मुले व स्त्रीयां यांना थोडे अंतरावर ठेवावे तसेच निर्माल्य पाण्यात न टाकटा कलश मध्ये टाकावे, वाहन अचानक बंद पडल्यास ओढण्यासाठी दोर असावा, वाहनाच्या समोर मंडळाचे नाव, अध्यक्षाचे नाव, मोबाईल नंबर असावा, संशयास्पद वस्तु दिसल्यास स्वतः न हाताळता पोलीसांना कळवावे तसेच कोणत्याही मदतीसाठी तात्काळ पोलीसांना संपर्क करावा अशा प्रकारच्या सुचना देण्यात आल्या.

सदर मिटींगमध्ये पोलीस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक  अर्चना पाटील, पो.नि. विकास पाटील, स्था.गु.शा., पो.नि. नरेंद्र पाडाळकर, पो.नि.  सुधिर वाघ व जिल्हयातील विविध मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, पत्रकार व प्रतिष्ठीत नागरीक उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या