Ticker

6/recent/ticker-posts

मेंढा/भूगाव शाळेला जिल्हा मुल्यांकन समितीची भेट

 "मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा" अभियान 

कालिदास खोब्रागडे,चित्रा न्युज
 भंडारा :- शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा. तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” हे स्पर्धात्मक अभियान महाराष्ट्र शासन संपूर्ण राज्यात राबवत आहे.  त्या अनुषंगाने ह्या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील बऱ्याचशा शाळांनी नोंदणी केलेली आहे. लाखनी तालुक्यातील शंभर टक्के शाळांनी या अभियानात भाग घेतला. केंद्रस्तरीय समितीने मूल्यांकन करुन केंद्रात प्रथम आलेल्या शाळांचे तालुकास्तरीय मूल्यांकन पार पडले व तालुकास्तरावर प्रथम आलेल्या शाळांचे मूल्यांकन जिल्हास्तरावरून करण्यात आले. 
                 लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेंढा/भूगाव, केंद्र मुरमाडी/तूप. ह्या शाळेला तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे नुकतीच जिल्हास्तरीय समितीने शाळेचे मूल्यांकन केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा च्या प्राचार्य डॉ. रत्नप्रभा भालेराव, जिल्हा परिषद भंडारा चे शिक्षणाधिकारी(प्राथमिक) रविंद्र सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी विनायक वंजारी, सर्व शिक्षा अभियान सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विरेंद्र गौतम हे अधिकारी ह्या मुल्यांकन समितीत  होते. मेंढा शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक पुरुषोत्तम झोडे हे शाळेत राबवत असलेले विविध शैक्षणिक उपक्रम, बालवाचनालय, स्वच्छ शाळा, आकर्षक व बोलकी इमारत, निसर्गरम्य वातावरण, वैज्ञानिक प्रयोग शाळा, गणित प्रयोग शाळा, आयसीटी प्रयोगशाळा, भाषा कोपरा, पुस्तक पेढी, क्रीडांगण, बालभारती कक्ष, परसबाग, आरोग्य तपासणी, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा, पर्यावरण सहभाग, कचरा पुनर्वापर, अध्यापनाची आधुनीक तंत्रे व साधने, अध्ययन पुरक वातावरण, बोलक्या भिंती, विविध योजनांची माहिती, तक्रार निवारण, शालेय अभिलेखे अशा विविध क्षेत्रातील शाळेची प्रगती पाहून मुल्यांकन समितीने समाधान व्यक्त केले. 
                      तत्पुर्वी गटविकास अधिकारी नेताजी धारगावे, गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे, शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर झोडे, साधन व्यक्ती गिरिश बांते यांनी तालुकास्तरिय मुल्यांकन केले होते. याकामी केंद्रप्रमुख खुशाल हरडे यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक कल्पना शेंडे, विठ्ठल हारगुडे, विजय बिसने, महेश घरजारे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र चुटे यांनी अथक परिश्रम घेतले. ग्रामपंचायत मेंढा/भूगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुल्यांकन समिती भेटीच्या वेळी सरपंच नलिनी बारसे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्य स्थापन समितीचे सर्व सदस्य, माजी अध्यक्ष नरेश बारसे व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या