• लाखनीत १० तर घरगुती ५१० गणपतींची स्थापना
कालिदास खोब्रागडे,चित्रा न्युज
भंडारा :- लाखनी येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ६२ गावापैकी २४ गावातील ४५ गणेश मंडळांकडून ४५ सार्वजनिक गणपतींची स्थापना केली असून त्यापैकी २० गावात १ गाव १ गणपती, ५१० घरगुती गणपती तर लाखनी शहरात १० सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली असल्याचे पोलिस अमलदार पियूष बाच्छिल यांनी कळविले आहे.
स्वातंत्र्य पूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरू केली होती. ती १०५ वर्षानंतर आजही कायम आहे. गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्याची जबाबदारी गणेश मंडळांनी स्वीकारली असली तरी जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव यांचे मार्फत आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात आकर्षक सजावट, भक्तिभाव आणि समाज प्रबोधन कार्यक्रमामुळे अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ वाढते आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पडावा. या करिता तालुका प्रशासन व पोलिस दल सज्ज आहेत. गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद लागोपाठ येत असल्याने मिरवणुकीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. या करिता पोलिस ठाणे लाखनी येथे गणेश मंडळ पदाधिकारी व मुस्लिम मौलवी आणि प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक आयोजित करून गणेशोत्सव ताठव ईद-ए-मिलाद शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाखनी पोलिस ठाण्याचे हद्दीत शहरात प्रभार क्रमांक १ सिपेवाडा रोड, प्रभाग क्रमांक ९ कुंभार मोहल्ला, प्रभाग क्रमांक १२ निर्वाण मोहल्ला, प्रभाग क्रमांक ४ नगर पंचायत जवळ, प्रभाग क्रमांक ३ लखोरी रोड संजय नगर, पाण्याचे टाकीजवळ, दत्त मंदिर परिसर, सेलोटी रोड आदर्श नगर, संजय नगर, मुरमाडी/सावरी-३, पोहरा-४, पिंपळगाव/सडक-२, रेंगेपार/कोहळी-२, गडेगाव-४ असे एकूण २५. या शिवाय घरगुती ५१० गणपतींची स्थापना करण्यात आली आहे.
*ह्या गावात "एक गाव एक गणपती"(चौकट)*
रेंगेपार/कोठा, निलागोंदी, मेंढा/पोहरा , पेंढरी, गुंथारा, राजेगाव(एमआयडीसी), नान्होरी, मोरगाव, खेडेपार, कनेरी/दगडी, बाम्हनी, मानेगाव/बेळा, खुटसावरी, बोरगाव, सोमलवाडा, सिपेवाडा, किन्ही, मुंडीपार/सिंदीपार, धानला, दिघोरी(लहान) ह्या २० गावात "एक गाव एक गणपती" ची स्थापना करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या