• शिवणी/मोगरा येथील घटना
• पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- डोक्याच्या असह्य त्रासामुळे दारूचे व्यसन लागले. अतिदारू पिऊन दारूच्या नशेत ३८ वर्षीय युवकाने स्वतःचे घरी मयालीला नायलॉन रस्सिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार(ता.१२ सप्टेंबर) दुपारी २:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. मृतकाचे नाव विनोद मंगल शेंडे(३८) रा. शिवणी/मोगरा, तालुका लाखनी असे आहे. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृतक शिवणी/मोगरा येथे वास्तव्यास असून त्याला डोक्याचा त्रास असल्यामुळे अतीप्रमाणात दारू पिण्याचे व्यसन लागले होते. दारूच्या नशेत त्याने स्वतःचे घरी मयालीला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांचे निदर्शनास आल्याने लाखनी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे, पोलिस शिपाई पंकज निरगुळे घटनास्थळी गेले. कुटुंबियांचे मदतीने मृतदेह खाली उतरवून सर्व सोपस्कार पार पाडले. तथा उत्तरीय परिक्षणासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आला. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यू मर्ग क्रमांक ३५/२०२४ कलम १९४ बीएनएस नुसार नोंद केली असून मन मिळावू विनोद च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे मृत्यू पश्चात पत्नी, १ मुलगा व मुलगी आहे.


0 टिप्पण्या