Ticker

6/recent/ticker-posts

अवैध दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

• किटाडी येथील घटना 

• पालांदूर पोलिसांची कारवाई

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किटाडी येथे अवैध देशीदारू विक्री होत असल्याचे गुप्त माहिती वरून अवैध दारू विक्रेत्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता ९० एमएल ने भरलेले २८ देशीदारूचे पव्वे किंमत ९८० रुपये जप्त केल्याची घटना गुरुवार(ता.१२ सप्टेंबर) रोजी सायंकाळी ५:४५ वाजता घडली. पोलिस शिपाई नाविद पठाण यांचे फिर्यादी वरून पालांदूर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचे नाव पुरुषोत्तम दयाराम दिघोरे(६५) रा. किटाडी, तालुका लाखनी असे आहे. 
                      जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय हद्दपार करण्याचा विडा उचलून अधीनस्त सर्व पोलिस ठाण्याला अवैध व्यवसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सोमवारी सायंकाळचे सुमारास पुरुषोत्तम दिघोरे हा अवैधरित्या विना पास परवाना देशी दारू विक्री करीत असल्याची गोपनीय खबर मिळाल्याने पोलिस शिपाई नाविद अमिरखा पठाण हे २ प्रतिष्ठित पंचासमक्ष घटनास्थळी गेले व पुरुषोत्तम दिघोरे यांचे घराची झडती घेतली असता घरातील लाकडी पलंगावर कापडी थैल्यात देशी दारूचे प्लास्टिक चे सिलबंद पव्वे टायगर आरव्ही बॅच नंबर १२८ ऑगस्ट २०२४ असे लेबल असलेले २८ पव्वे प्रत्येकी ९० एमएल नी भरलेले प्रत्येकी पव्व्याची किंमत ३५ रुपये प्रमाणे एकूण ९८० रुपयाचा माल विना पास परवाना बाळगून विक्री करतांना मिळून आल्याने पोलिस शिपाई नाविद पठाण यांचे फिर्यादी वरून पालांदूर पोलिसांनी पुरुषोत्तम दिघोरे याचे विरुद्ध अपराध क्रमांक १४९/२०२४ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने यांचे मार्गदर्शनात तपास सुरू असून या कारवाईने अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या