सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे
अमरावती :-दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तळेगाव दशा येथील गुरुदेव सेवा मंडळाची पालखी मोझरी येथील गुरुकुंज आश्रम जाण्या साठी निघाली.21 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त ही पालखी निघाली आहे तब्बल 56वर्षांपासून पूर्ण पणे पायदळ पालखी जात असते तर.तळेगाव येथून पुढेशेदुर्जना खुर्द,आमला विश्वेश्वर, कुऱ्हा,याठिकाणी आराम व जेवण्याची सोय त्या त्या गावातील लोक करीत असतात.सोबत महिला,बालगोपाल, व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने सोबत असतात.सध्या दिवसा उनीचे प्रमाण अधिक असून सुधा पालखी सोबत ची संख्या कमी झाली नाही.
रोडने जातांना भजन म्हणत म्हणत जातात व मुक्कामाच्या ठिकाणी रात्री कीर्तन प्रवचन केल्या जाते.यामुळे राष्ट्र संताच्या विचाराचे व ग्रामगीतेचा प्रचार व प्रसार होतो.असे येथील गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वेसर्वा बगाडे दादा यांनी प्रार्थनेच्या वेळी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी पालखी सोबत माजी.जी. प.सदस्य अशोकराव धनजोडे,भौरावजी बगाडे, बुधे गुरुजी,प्रकाश रींगे,पालखी प्रमुख वाडकर,सौ. रिंगे,सौ. हेमा देशमुख, प. स.माजी.सभापती डॉ.विनोद देशमुख,सुबोध ठाकरे,खुशाळराव गोडबोले,वासुदेवराव घरत,अजय ढवळे,प्रवीण वाडकर,नयन ठाकरे,शंकर खोडे,मंगेश गोडबोले,विजय मत्ने,सुरेश चूते,विजय ढवळे,दादाराव जांब्वाले , पुष्पा गोखे,शांता काळे,पुष्पा बाई दुदे,वंदना सूने,दुर्गा दोनाडकर,अचल शिंदे,समीक्षा नेरकर,सुधाकर राऊत,आदिती वाडकर,कुसुम वाडकर,वंदू जयसिंगपूर,प्रमिला गुजर,विमल कडकर,हिमांशू बुढे,इत्यादी उपस्थित होते


0 टिप्पण्या