Ticker

6/recent/ticker-posts

महापालिकेत महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी



विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी,,

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके तर्फे आज दि.१७ आक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्य प्रशासकीय इमारत स्थायी सभागृह कक्ष येथे "महर्षि वाल्मिकी " यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी मनपाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ.जनार्दन पक्वाने, लेखाधिकारी श्रीनिवास चन्नावार, अंतर्गत लेखापरिक्षक श्री सुधिर इंगोले, सिस्टीम मॅनेजर श्री सदाशिव पतंगे, सहाय्यक आयुक्त कु.मनिषा नरसाळे,शहर अभियंता श्री सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता श्री संघरत्न सोनसळे, उपअभियंता श्री व्यंकटेश गोकुळे, प्रकल्प व्यवस्थापक श्री अशोक सूर्यवंशी, वरिष्ठ लिपीक सौ.सुजाता वाडियार, श्री गजानन रासे यांच्यासह मनपाचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या