लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामिण नांदेड
नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील गावठाण डी पी वरील रोहित्र गेले दोन महिन्यापासून जळाली असल्याने गावात दररोज रात्री बे रात्री विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने रोग राईला आमंत्रण मिळत असुन आज रोजी शेतातील शेतिचे काम दिवसभर करुन घरी आलेल्या विधूत ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यान लक्षात येताच पळसपुर येथील ग्रामस्थांच्या वतीने येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नागोराव शिंदे यांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता नांदेड यांना हिमायतनगर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत एक निवेदन देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी मागणी केली असुन पळसपुर येथे हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसपुर येथील ३३ के व्हि उपकेंद्रातुन सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याने आपल्या घरगुती ग्राहकांना वारंवार डी पी जळत आहेत तर गेल्या दोन महिन्यांपासून सिंगल फेज डी पी नसल्याने लहान मुलांना मोठ्या प्रमाणात डासां चा त्रास होत आहे व शेतीमध्ये कामाचे दिवस असल्याने आपल्या महावितरणच्या कर्मचाऱ्या कडून पळसपुर येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नसल्याने अधिक्षक अभियंता नांदेड यांनी वरील बाबीची दखल घेऊन पळसपुर गावठाण येथील विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आपल्या कर्याल्यासमोर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी उप विभागीय अधिकारी हिमायतनगर यांच्या मार्फत अधीक्षक अभीयंता यांच्या कडे नागोराव शिंदे पळसपुरकर यांनी केली आहे
0 टिप्पण्या