Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावतीच्या महावितरण अधिकाऱ्यांना एक तास उन्हात बांधुन ठेवायला पाहिजे .....

भद्रावती येथील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : येथील महावितरण कंपणीचा अजब कारभार दहावी - बाराविच्या परीक्षा सुरु झाल्या की भद्रावती महावितरण अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्याही अंगात भुत शिरतो की अजुन काय शिरतो कुणास ठाऊक ऊठसुठ लाईन बंद करण्याचे प्रकार मे - जुन महीन्यासारख्या अति तिव्र ऊन्हातही सुरुच राहते. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार तर यांच्या डोक्यात येतच नसेल पण अतीवृद्ध व नवजात बालकांचीही यांना किव येत नाही,ईतके जर निष्ठुर पनाने अधिकारी माजले असेल तर यांना मे- जून महिन्यात एक तास ऊन्हात कार्यालयाच्या बाहेर एखाद्या पोलला बांधुन ठेवले पाहिजे.तेंव्हा समजेल जनता कशी सहन करत असेल ऊकाडा असे संतप्त रोष नागरिक करीत आहे.
 भद्रावती महावितरण कंपनी बिल नाही भरले तर दारावर येवुन धडकते,त्या तुलनेत विज ग्राहकांना सुविधा देत नाही. कित्येक वर्षापासुन सर्वीस वायर टाकले त्यावरच काम सुरु आहे. पोलवरील तांत्रिक त्रुटि कायमस्वरुपी दुरुस्त करण्याऐवजी थातुर मातुर उपाय करुन वेळकाढु धोरण अवलंबतात. काही दिवसानंतर जोरात हवाधुंदआली की पुन्हा पोलवरुन विज पुरवठा बंद होत असतो.संपुर्ण ऊन्हाळाभर तुफान नसतांना,वादळी पाऊस नसतांना लाईन लपंडाव चालुच असते. एका एका तासाने कधी पांच मिनीटासाठी कधी विस मिनीटासाठी तर कधी एक तास दोन तासही लाईन येत नाही.काही भागात तर सकाळी गेलेली लाईन संध्याकाळीच आल्याची खबर आहे. संध्याकाळी लाईन गेली तर विस मिनीट म्हणता दोन तास लाईन नाही आली तरी आम्ही सहन करु शकतो पण दुपारी कडक उन्हात दोन मिनीट सुद्धा ऊकाडा सहन होत नाही.वेळोवेळी लाईन जाण्याबाबत कार्यालयाला फोनवरुन विचारना केली तर " फिडर शिफ्ट करने सुरु आहे" हे एकच उत्तर संपूर्ण चार महिन्यात (ऊन्हाळाभर) मिळत असते.दरवर्षी हाच तांत्रिक बिघाड असतो तर नेहमीसाठी दुरुस्त कां केल्या जात नाही? ऊन्हाळ्यात करण्याऐवजी हिवाळ्यात का केली जात नाही हिवाळ्यात केली तर कर्मचारी व जनता दोघांनाही त्रास होणार नाही. ऊन्हाळ्यात जनतेला त्रास देणे योग्य नाही, कारण चंद्रपुर जिल्हा देशात नंबर एक व जगात नंबर दोन वर तापमानासाठी प्रसिद्ध आहे.तरी येथील जनतेला महावितरण कंपनी कडुन सहकार्याची अपेक्षा करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या