पद्माकर वळवी यांनी आमचा विश्वासात केला- आदिवासी संघटना
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : माजी आमदार पद्माकर वळवी यांना या नंदूरबार जिल्ह्य़ात फिरू देणार नाही,अशी धमकी धडगांव येथील शिवसेना शिंदेगटाच्या एका जाहीर सभेत विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी दिली होती.त्यानंतर बिरसा फायटर्स, भारत आदिवासी संविधान सेना,भारतीय स्वाभीमानी संघ,बिरसा आर्मी अशा विविध आदिवासी संघटनांनी माजी आमदार पद्माकर वळवी यांची बाजू घेऊन चंद्रकांत रघुवंशी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून व काळे झेंडे दाखवून धडगांव व शहादा येथे जाहीर निषेध नोंदवला होता.
भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी विधानपरिषद सदस्य यांनी नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासींच्या जमिनी तसेच महारवतन,ईनामी, सरकारी,गायचरण,राममंदिराची जमिनी बेकायदेशीर, अवैद्य रित्या, बोगस पद्धतीने,व्हायटर लावून हडप केल्या व आदिवासी संघटना ह्या तीनपाट आहेत, अशी शिवीगाळ करून आदिवासी समाजाला तुच्छ लेखून अपमानित केल्याबद्दल त्यांच्यावर शहादा पोलीस ठाण्यात ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करीत नसल्याविरोधात आदिवासी संघटनांनी शहादा व अक्कलकुवा येथे चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून विरोध केला.१२ जून ला शहादा तालुका बंद करून निषेध नोंदवला.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चंद्रकांत रघुवंशी यांनी हडप केलेल्या जमिनींची चौकशी करून कायदेशीर कारवाई करा,मूळ जमीन मालकास जमिनी परत करा व चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा,अशी मागणी केली आहे.
चंद्रकांत रघुवंशीविरोधात आदिवासी संघटनांचे जोरदार आंदोलन सुरू असतांना तळोदा येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात माजी आमदार पद्माकर वळवी,माजी आमदार उदयसिंग पाडवी हे चंद्रकांत रघुवंशी यांच्या सोबत चर्चा करताना व हातमिळवणी करताना एक फोटो सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.हे बघून आदिवासी संघटनांना धक्काच बसला.पद्माकर वळवी हे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार व मंत्री होते.लोकसभा निवडणूक काळात त्यांनी काँग्रेस मधून भाजप पक्षात प्रवेश केला.त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीत प्रवेश केला व अक्कलकुवा व अक्राणी या मतदारसंघातून भारत आदिवासी पार्टीतर्फे उमेदवारी केली.त्यांना आठ हजाराच्या आसपास मते मिळाली होती.आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.
पद्माकर वळवी यांनी भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी सोबत जाऊन आदिवासी संघटनांचा विश्वासघात केला आहे,समाजाशी गद्दारी केली आहे.स्वार्थासाठी दल बदलू पक्ष बदलू नेत्यांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.भविष्यात पद्माकर वळवी कुठेही निवडणुक लढवतील, तेथे आदिवासी जनतेने त्यांना मतदान करू नये,पद्माकर वळवी यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,कार्याध्यक्ष रवींद्र वळवी,सुनिल पवार,भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,बिरसा आर्मीचे अजय वळवी,बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी,तळोदा अध्यक्ष सुभाष पावरा,रविद्र पावरा,
दिनेश पावरा,विजय पावरा, पवन सोलंकी,आदिवासी टायगर सेनेचे सचिव पावरा आदि विविध संघटनांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या