Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीचा मुंबई महानगर पालिकेसाठी जाहीरनामा आज घोषित होणार!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वंचित बहुजन आघाडीने आता मुंबईच्या विकासाचा आपला 'रोडमॅप' जनतेसमोर ठेवणार आहे.

मुंबई महापालिकेसाठी पक्षाचा अधिकृत 'जाहीरनामा' आज, ८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता दादर येथील ऐतिहासिक 'राजगृह' निवासस्थानी घोषित केला जाणार आहे.

बड्या नेत्यांच्या उपस्थितीत सोहळा

या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याला वंचित बहुजन आघाडी आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये भीमराव य. आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), प्रा. अंजलीताई आंबेडकर (राष्ट्रीय नेत्या, वंचित बहुजन आघाडी), सिद्धार्थ मोकळे (राज्य उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते), चेतन अहिरे (मुंबई अध्यक्ष), स्नेहल सोहनी (महिला आघाडी मुंबई अध्यक्ष), सागर गवई (मुंबई युवा अध्यक्ष) यांची उपस्थिती असणार आहे.

यंदाच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांना भेडसावणाऱ्या ड्रेनेज समस्या, पाणीपुरवठा आणि बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांवर नेमक्या काय उपाययोजना केल्या जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या