Ticker

6/recent/ticker-posts

श्री. सदानंद वसंत दाते यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई :-महाराष्ट्र शासनाने भारतीय पोलीस सेवेतील (भा.पो.से.) १९९० बॅचचे वरिष्ठ अधिकारी श्री. सदानंद वसंत दाते यांची पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य (Head of Police Force – HoPF) या सर्वोच्च पदावर नियुक्ती केली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश शासनाकडून जारी करण्यात आला आहे.

श्री. दाते यांनी यापूर्वी राज्य तसेच केंद्र स्तरावर विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य करताना कायदा-सुव्यवस्था, दहशतवादविरोधी कारवाई, गुप्तचर व तपास यंत्रणांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा लाभ राज्याच्या पोलीस प्रशासनाला होईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

नवीन पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करणे, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, तसेच नागरिकाभिमुख पोलीस व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या